नेरच्या तरुणाला खुनात जन्मठेप
By admin | Published: March 16, 2016 08:39 AM2016-03-16T08:39:22+5:302016-03-16T08:39:22+5:30
पूर्ववैमनस्यातून तलवारीने हल्ला करून एकाला ठार तर तिघांना गंभीर जखमी करणाऱ्या नेर येथील तरुणाला येथील
यवतमाळ : पूर्ववैमनस्यातून तलवारीने हल्ला करून एकाला ठार तर तिघांना गंभीर जखमी करणाऱ्या नेर येथील तरुणाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
नसरूल्ला खान जहाबाज खान (२८) रा. नबाबपुरा नेर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. नसरूल्लाने आपल्या २२ सहकाऱ्यांसह २ फेब्रुवारी २००८ रोजी नेर येथील एका सलूनमध्ये बसून असलेल्या जावेद खान वाहेद खान (२७) रा. नबाबपुरा नेर याच्यावर तलवारीने हल्ला करून ठार केले होते. तर अनिस खान मुस्तफा खान, नसरूल्ला खॉ अफसार खान पठाण, असरार उर्फ इसरार खॉ पठाण यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी फिर्यादी अनीस खॉ तयब्ब खॉ पठाण याच्या तक्रारीवरून खुनासह प्राणघातक हल्ला आणि दंगल घडविण्याचा गुन्हा आरोपींवर दाखल करण्यात आला होता. घटनेपासून आरोपी फरार होता. या प्रकरणात तपास अधिकारी ठाणेदार राम हाके यांनी दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात १८ साक्षी तपासण्यात आले. द्वितीय जिल्हा सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी आरोपी नसरूल्ला खान याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात शासकीय अभियोक्ता नीता दवे यांनी फिर्यादीची बाजू मांडली.