पुसदच्या रुग्णालयात पोटावर कातडी नसलेले बाळ जन्मले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 05:24 PM2017-07-30T17:24:33+5:302017-07-30T17:25:18+5:30

निसर्ग कोणता चमत्कार कधी करेल याचा नेम नसतो. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयातही असाच एक चमत्कार रविवारी सकाळी पहावयास मिळाला. पोट नसलेल्या एका बाळाला महिलेने जन्म दिला.

New born baby have no skin on stomach | पुसदच्या रुग्णालयात पोटावर कातडी नसलेले बाळ जन्मले

पुसदच्या रुग्णालयात पोटावर कातडी नसलेले बाळ जन्मले

Next
ठळक मुद्देबाळंतीण सुखरुप 

प्रकाश लामणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद (यवतमाळ) : निसर्ग कोणता चमत्कार कधी करेल याचा नेम नसतो. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयातही असाच एक चमत्कार रविवारी सकाळी पहावयास मिळाला. पोट नसलेल्या एका बाळाला महिलेने जन्म दिला. पोटावर कातडी नसल्याने संपूर्ण आतडी उघडी आहे. अधिक उपचारासाठी बाळ आणि बाळंतिणीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.
पुसद तालुक्यातील आडगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात संगीता अनिल चव्हाण (२५) या महिलेने रविवारी सकाळी एका मुलीला जन्म दिला. मात्र या बाळाच्या पोटावर त्वचा नसल्याने त्याची सगळी आतडी उघडी पडली होती. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा बाळ डोळे उघडत होते. तसेच संगीताही सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बाळाच्या पोटावर कातडीचे आवरण नसणे याला वैद्यकीय दृष्ट्या गॅस्ट्रो सियासीस असे म्हणतात. एक लाख प्रसूतीमागे एखादे बाळ असे जन्माला येते. अशा बाळांच्या पोटावर स्कीन कव्हरिंग लावणे शक्य होत नाही. त्यांचा संसर्गाने लवकरच मृत्यू होतो. कुठलाही ठोस उपाय नसल्याने केवळ सलाईनचे गॉज ठेऊन आणि अ‍ॅन्टीबायोटिकचा वापर करून उपचार करावा लागतो. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही.
- डॉ. मिलिंद कांबळे
बालरोग विभाग प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

Web Title: New born baby have no skin on stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.