पाणी चोरीचा नवीन फंडा

By Admin | Published: July 17, 2014 12:21 AM2014-07-17T00:21:16+5:302014-07-17T00:21:16+5:30

शहरातील पाणीटंचाईसाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी पाणी चोरी ही प्रमुख आहे. अनेकांनी पाणी चोरण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली आहे. पाण्याच्या मीटरपर्यंत

A new fund for theft of water | पाणी चोरीचा नवीन फंडा

पाणी चोरीचा नवीन फंडा

googlenewsNext

रिडिंग घेताना दुर्लक्ष : अनेक भागात होतो पाण्याचा अपव्यय
यवतमाळ : शहरातील पाणीटंचाईसाठी कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी पाणी चोरी ही प्रमुख आहे. अनेकांनी पाणी चोरण्यासाठी नवीन शक्कल शोधून काढली आहे. पाण्याच्या मीटरपर्यंत जाणाऱ्या पाईपलाईनला मध्येच रबरी पाईप बसवून तेथून थेट पाणीपुरवठा घेतला जातो. या पाण्याचा अतिशय बेजबाबदारीने वापर होतो. तेथे मोटरपंप लावून पाणी घेण्यात येते. परिणामी अनेक भागात पुरेशा दाबाने पाणीच पोहोचत नाही.
पाणी चोरीच्या या नवीन फंड्यामुळे जीवन प्राधिकरणचे नियोजन कोलमडत आहे. अनेक ठिकाणी मोटरपंप लावूनही पिण्यापूरतेही पाणी येत नाही. ज्याठिकाणी पाण्याची चोरी होते तेथे शुद्ध पाण्याचा वापर हा बांधकामासाठी, वाहने धुण्यासाठी केला जातो. सातत्याने हे पाणी बेजबाबदारपणे विविध कामांसाठी वापरले जाते. एकीकडे नळाच्या पाण्यासाठी रात्ररात्र जागणाऱ्या कुटुंबांची परवड सुरू आहे. मात्र काही भागात संधीसाधूंनी पाणी चोरीच्या माध्यमातून उधळपट्टी सुरू केली आहे. शिवाय पाण्याचे मीटर फिरत नसल्याने त्यांना कुठलाच भुर्दंड बसत नाही. मीटर रिडींग घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहज नजर टाकल्यास हा पाणीचोरीचा प्रकार उघडकीस येऊ शकतो. जीवन प्राधिकरणच्या उपअभियंत्यांनी याची तातडीने दखल घेऊन पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे. जेणेकरून पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही. शिवाय पाणी चोरट्यांवर वचक निर्माण करता येईल. यासाठी जीवन प्राधिकरणने विशेष पथकाचे गठण करून स्वतंत्र मोहीमच हाती घेण्याची गरज आहे. याबाबत अ‍ॅड. श.श्री.माळवी यांनी जीवन प्राधिकरणच्या उपविभागीय अभियंत्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: A new fund for theft of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.