बाबूजींना नव्या पिढीचे कृतीशिल अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:24 PM2019-07-02T21:24:06+5:302019-07-02T21:24:24+5:30

राजकारणातही साधनशुचिता जपत नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीदिनी तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. समाजासाठी आयुष्य वेचणाºया बाबूजींना रक्तदान आणि वृक्षारोपण या माध्यमातून कृतीशिल अभिवादन करण्यात आले.

New Generation Kritiashil greetings to Babuji | बाबूजींना नव्या पिढीचे कृतीशिल अभिवादन

बाबूजींना नव्या पिढीचे कृतीशिल अभिवादन

Next
ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा जयंती : ‘जेडीआयईटी’मध्ये रक्तदान आणि वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राजकारणातही साधनशुचिता जपत नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीदिनी तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. समाजासाठी आयुष्य वेचणाºया बाबूजींना रक्तदान आणि वृक्षारोपण या माध्यमातून कृतीशिल अभिवादन करण्यात आले.
‘लोकमत’चे संस्थापक संपादक तथा स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंती मंगळवारी २ जुलै रोजी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात (जेडीआयईटी) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. संस्थेचे सचिव लोकमत जिल्हा कार्यालयप्रमुख किशोर दर्डा, डॉ. लव किशोर दर्डा, सोनाली लव दर्डा, जेडीआयईटीचे प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्ववादी, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा, वायपीएसचे प्राचार्य डॉ. जेकब दास, बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य वीरेंद्र तलरेजा यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबूजींच्या प्रतिमेला अभिवादन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि लोकमत परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ८२ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यात महाविद्यालयीन तरुण-तरुणी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सामान्य नागरिकांचाही समावेश होता. शिबिरात रक्तसंकलनासाठी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी विभागाच्या चमूचे सहकार्य लाभले. मेडिकलचे समाजसेवा अधीक्षक मोबिन दुंगे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. उमर काझी, प्रदीप वाघमारे, राहुल भोयर, जीवन टेकाडे, दिलीप केराम आदींचा या चमूत समावेश होता.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड, प्रा. सागर जिरापुरे, प्रा. नितीन चव्हाण, प्रा. प्रगती पवार, प्रा. निशांत खर्चे, प्रा. विद्याशेखर, विलास देशपांडे, सुभाष यादव, रासेयोचे विद्यार्थी गटप्रमुख सोमन गटलेवार, धनंजय तुळसकर, मयूर मांडवकर, नदीम शेख, खालीद आदींनी परिश्रम घेतले.
प्रेरणास्थळावर आठवणींना उजाळा
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांची समाधी असलेल्या दर्डा उद्यान स्थित प्रेरणास्थळावर बाबूजींना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मान्यवरांनी हजेरी लावली होती. त्यांनी पुष्प अर्पण करून बाबूजींना अभिवादन केले. यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून प्रेरणास्थळावर हजेरी लावली. जुन्या-जाणत्या मान्यवरांनी बाबूजींच्या प्रेरक आठवणींना यावेळी उजाळा दिला.

Web Title: New Generation Kritiashil greetings to Babuji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.