बांधकाम निविदांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 05:52 AM2019-09-20T05:52:31+5:302019-09-20T05:52:34+5:30

शासनाच्या वेळोवेळी निघणाऱ्या आदेशांचा अभियंत्यांनी आपल्या सोईने वेगवेगळा अर्थ लावण्यामुळे राज्यभर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनेक निविदा वादात सापडल्या होत्या.

New guidelines for construction tenders | बांधकाम निविदांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे

बांधकाम निविदांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे

Next

राजेश निस्ताने
यवतमाळ : शासनाच्या वेळोवेळी निघणाऱ्या आदेशांचा अभियंत्यांनी आपल्या सोईने वेगवेगळा अर्थ लावण्यामुळे राज्यभर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनेक निविदा वादात सापडल्या होत्या. अनेक प्रकरणे न्यायालयातही गेली. त्यापासून धडा घेत आता सार्वजनिक बांधकाम खात्यातील निविदांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे.
बांधकाम सचिव (रस्ते) चंद्रशेखर जोशी यांच्या स्वाक्षरीने नुकताच याबाबतचा आदेश काढला आहे. त्यानुसार त्रुटी असणाºया निविदा थेट फेटाळता येणार नाहीत, त्रुटींची पूर्तता करण्याची संधी कंत्राटदाराला द्यावी लागणार आहे. अनेकदा कंत्राटदार कामे मिळविण्यासाठी साखळी करतात, निविदा उघडू नये म्हणून ‘माझा आर्थिक देकार उघडण्यात येऊ नये अथवा मी स्पर्धेतून माघार घेत आहे’ असे लिहून देतात. परंतु आता या प्रकाराला चाप बसणार आहे. कमी दराची निविदा भरलेल्या कंत्राटदारांनी असे लिहून दिले तरी ती निविदा उघडण्याचे बंधन अभियंत्यांवर राहील. कंत्राटदाराने निविदा सादर करताना खोटी कागदपत्रे दिल्यास आतापर्यंत केवळ त्याची निविदा नाकारली जात होती. परंतु आता थेट काळ्या यादीत टाकले जाणार आहे.
>छोट्या कंत्राटदारांची सोय
बीड कॅपेसिटी या प्रकारात बडे कंत्राटदार आपल्या परवाना क्षमतेपेक्षा किती तरी पट अधिक कोटींची कामे अडकवून ठेवत होता. परंतु आता अव्वाच्या सव्वा कामे घेण्याची ही पद्धत बंद करण्यात आली आहे. परवान्याऐवढीच कामे घेता येणार आहे. पर्यायाने उर्वरित कामे छोट्या कंत्राटदारांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: New guidelines for construction tenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.