घाटंजीत व्यसनमुक्ती रॅलीने नवीन वर्षाचे स्वागत
By admin | Published: January 6, 2016 03:23 AM2016-01-06T03:23:38+5:302016-01-06T03:23:38+5:30
नववर्षाचे स्वागत घाटंजीवासीयांनी अनोख्या पद्धतीने केले. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री दारू ढोसून केला जाणारा धिंगाणा रोखण्यासाठी
प्राऊटिस्ट फ्रंट : ‘थर्टी फर्स्ट’च्या दारू पार्ट्यांना शांततामय मार्गाने केला विरोध
घाटंजी : नववर्षाचे स्वागत घाटंजीवासीयांनी अनोख्या पद्धतीने केले. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री दारू ढोसून केला जाणारा धिंगाणा रोखण्यासाठी नागरिकांनी व्यसनमुक्ती रॅली काढून नागरिकांना सौजन्याने नववर्ष साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. प्राऊटिस्ट फ्रंटच्या पुढाकाराने निघालेल्या रॅलीत महाविद्यालयीन तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिक सहभागी झाले.
येथील गिलाणी महाविद्यालयाच्या प्रांगणातून सायंकाळी व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली. फ्राऊटिस्ट फ्रंटचे मधुकर निस्ताने यांच्या मार्गदर्शनात शहरातील प्रमुख मार्गांनी ही रॅली फिरली. शहीद स्मारक चौकात रॅलीचा समारोप झाला. यावेळी प्राऊटिस्ट फ्रंटचे मधुकर निस्ताने, रणजित बोबडे, शुक्ला, मोरेश्वर वातीले, नगराळे, कटकोजवार, निमसरकर, प्रफुल्ल राऊत, प्रदीप वाकपैजन, संदीप माटे, हरिभाऊ पेंदोर, डोहळे, सुहास ठाकरे, पांडुरंग निकोडे, अरुण कांबळे, बाबाराव महल्ले आदींनी मार्गदर्शन केले. शांततामय मार्गाने ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्ट्यांना विरोध करण्यात आला. प्राऊटीस ब्लॉक इंडियाच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीमध्ये स्वरजीवन संस्था, प्रदीप बहुद्देशीय संस्था, विकासगंगा संस्था, दिलासा संस्था, गुरूदेव सेवा मंडळ, संघमित्रा व प्रियदर्शिनी मुलींचे वसतिगृह, समर्थ वसतिगृह, सिद्धार्थ वसतिगृह, एसपीएम वसतिगृह या संस्थांनी सहभाग घेतला. घाटंजीत निघालेल्या व्यसनमुक्ती रॅलीकरिता मीरा वाकपैजन, अमोल गिरी, सुरेश आंबेपवार, गणेश खापर्डे, वामन मोहुर्ले, अन्सार शेख, रवी शेडमाके, शेख चाँद, मोरेश्वर गेडाम, नरेंद्र धनरे, वीरेंद्र देशमुख, अशोक जयस्वाल यांनी परिश्रम घेतले.
नरेश कुंटलवार, मोहन पवार, नारायण बनसोड, अर्चना गुरनुले, राखी सोनुले, नितीन मोहुर्ले, मोहन जगताप यांनी प्रबोधनपर गीते सादर केली. पीएसआय येडमे, जमादार दुबे, बुर्रेवार, वाघाडे, चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला. (तालुका प्रतिनिधी)