निळोणा, चापडोहमध्ये ७० टक्के पाणी, तरी यवतमाळ शहर तहानलेलेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:00 AM2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:28+5:30

जिल्ह्याच्या जलायशामध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत जलप्रकल्पातील पाण्याच्या मदतीने ४२ हजार ७५० हेक्टरवरील सिंचन पूर्णत्वास गेले आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने हजारो लिटर पाणी यातून वाहून गेले आहे. यामुळे धरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही अपेक्षित सिंचन मात्र अद्यापही झाले नाही.

In Nilona, Chapadoh 70 percent water, yet the city of Yavatmal is thirsty! | निळोणा, चापडोहमध्ये ७० टक्के पाणी, तरी यवतमाळ शहर तहानलेलेच !

निळोणा, चापडोहमध्ये ७० टक्के पाणी, तरी यवतमाळ शहर तहानलेलेच !

googlenewsNext
ठळक मुद्देमाळपठारावरील ६५ हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निसर्गाच्या कृपेने यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प उन्हाळ सुरू होऊनही भरलेले आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पामध्ये अद्यापही ७० टक्के जलसाठा आहे. यानंतरही शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे माळपठारावरील (ता. पुसद) ४० गावांसाठी मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न झाल्याने या भागातील ६५ हजार नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहे.
जिल्ह्याच्या जलायशामध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत जलप्रकल्पातील पाण्याच्या मदतीने ४२ हजार ७५० हेक्टरवरील सिंचन पूर्णत्वास गेले आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने हजारो लिटर पाणी यातून वाहून गेले आहे. यामुळे धरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही अपेक्षित सिंचन मात्र अद्यापही झाले नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन दररोज कुठे ना कुठे फुटत आहे. इतकेच नव्हे तर आता तर मुख्य पाईपलाईनही दोन वेळा फुटली आहे. यातून दरदिवसाला दीड कोटी लिटर पाण्याची गळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यातून यवतमाळ शहरातील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

गत चार महिन्यांपासून इसापूर धरणातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. ही योजना सुरू करण्यात यावी म्हणून वारंवार लोकप्रतिनिधींकडे विषय मांडला. योजना मंजूर झाली. अद्यापही कार्यान्वित झाली नाही. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
- जयश्री राठोड,
सरपंच, बेलोरा

गावात गत अनेक महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. श्रीमंत व्यक्ती टँकरने पाणी आणू शकतात. सर्वसामान्यांना विहीर अथवा सार्वजनिक ठिकाणी पाण्यासाठी जावे लागते. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
- गणेश पठाडे,
सरपंच, मारवाडी

गतवर्षभरापासून पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होत आहे. खासगी बोअरवरून नागरिक पाणी भरत आहे. आता बोअरचे पाणीही खाली गेले आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याची स्थिती भीषण होण्याचे चित्र आहे. तत्पूर्वी लोकप्रतिनिधींनी योजना कार्यान्वित करावी.
- राजू पारीसकर,
पोलीस पाटील, रोहडा

पूर्ण पावसाळा संपला. मात्र ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाºया विहिरीमध्ये फसलेली मोटर निघाली नाही. संपूर्ण गाव एक किलोमीटरवरून पाणी आणत आहे. वारंवार सूचना केल्या. अजूनही फसलेली मोटर निघाली नाही. इसापूरचे पाणी दूषित झाले आहे. - रमेश मस्के, कुंभारी.

Web Title: In Nilona, Chapadoh 70 percent water, yet the city of Yavatmal is thirsty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.