मंगळसूत्र चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस

By admin | Published: June 27, 2017 01:24 AM2017-06-27T01:24:40+5:302017-06-27T01:24:40+5:30

शहरातील मंगळसूत्र चोरीची कडी वडगाव रोड पोलिसांच्या हाती लागली असून आरोपीने तब्बल नऊ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

Nine crimes of theft of Mangalsutra expose | मंगळसूत्र चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस

मंगळसूत्र चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस

Next

सुवर्णकाराची कबुली : ११८ ग्रॅम सोने जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील मंगळसूत्र चोरीची कडी वडगाव रोड पोलिसांच्या हाती लागली असून आरोपीने तब्बल नऊ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी ११८ ग्रॅम सोने हस्तगत केले असून इतर गुन्ह्यांच्या शोधासाठी आरोपीची पोलीस कोठडी घेतली जाणार आहे.
सराफा कारागीर सचिन नारायण चित्रयू (३५) रा. शास्त्रीनगर यवतमाळ असे वडगाव पोलिसांच्या हाती लागलेल्या मंगळसूत्र चोरट्याचे नाव आहे. त्याने शहरातील बोरेले ले-आऊट, नवप्रभात कॉलनी, गिलाणीनगर, कृषीनगर, ज्येष्ठ नागरिक भवन, महादेवनगर, सत्यसाईज्योत मंगल कार्यालय परिसरात, काळे-लेआऊट येथील घटनांची कबुली दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले होते. सातत्याने संधी मिळेल तिथे तो हात साफ करीत होता. मात्र गत आठवड्यात दर्डानगर परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र लंपास झाले. त्यानंतर सचिन चित्रयू पोलिसांच्या तावडीत सापडला आणि मंगळसूत्र चोरट्यांची कडीच हाती लागली. त्याने कबुल केलेल्या गुन्ह्यांपैकी दर्डानगर मंगळसूत्र चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
त्याचा चुलत भाऊ मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा येथे राहतो. आरोपीने सोने तेथेच विकल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे शोध पथकासह तेथे जाऊन आले. परंतु काहीही हाती लागले नाही. सध्या कबुली दिलेल्या गुन्ह्यातील सोने जप्त करण्याची कारवाई सुरू असून त्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची न्यायालयात मागणी केली जाणार आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

Web Title: Nine crimes of theft of Mangalsutra expose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.