अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी नउ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:54+5:302021-06-28T04:27:54+5:30
तालुक्यातील मोहा (ई) येथे गावालगत नीलेश देवसिंग राठोड, देवसिंग काळू राठोड यांचा अवैध वीट भट्टी कारखाना सुरू आहे. त्याबाबत ...
तालुक्यातील मोहा (ई) येथे गावालगत नीलेश देवसिंग राठोड, देवसिंग काळू राठोड यांचा अवैध वीट भट्टी कारखाना सुरू आहे. त्याबाबत नागरिकांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. तहसीलदारांनी तलाठ्याला अहवाल सादर करण्याचे आदेेश दिले. तलाठ्याला नीलेश देवसिंग राठोड, त्याचे वडील देवसिंग काळू राठोड यांच्या शेतात अवैध वीट भट्टी सुरू असल्याचे दिसून आले. तेथे अंदाजे ५५ हजार विटा, २५ हजार कच्च्या विटा व ५० ब्रास कळ्या मातीचा साठा आढळला. त्यामुळे तलाठ्याने वीट भट्टी व्यावसायिकावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर केला.
तहसीलदार अशोक गिते यांनी अहवालावरून नीलेश देवसिंग राठोड, देवसिंग काळू राठोड यांनी अवैध माती साठा करून विटा तयार करण्याचे काम सुरू केल्यामुळे नऊ लाख ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड वसूल करण्याचे आदेश गिते यांनी पारित केले. विहीत मुदतीत दंडाचा भरणा न केल्यास सदर रक्कम जमीन महसुलाची वसुली म्हणून वसूल करण्यात येईल, असा आदेशही पारित केला आहे. त्यामुळे बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्या अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.