नऊ हजार शेतकरी मुक्कामी

By Admin | Published: April 26, 2017 12:14 AM2017-04-26T00:14:10+5:302017-04-26T00:14:10+5:30

तूर खरेदीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील १३ केंद्रांवर सुमारे नऊ हजार शेतकरी मुक्कामी आहेत.

Nine Thousand Farmer Pauses | नऊ हजार शेतकरी मुक्कामी

नऊ हजार शेतकरी मुक्कामी

googlenewsNext

तूर विक्रीची प्रतीक्षा : बाजार समित्यांमध्ये सोयीसुविधांचा अभाव
रूपेश उत्तरवार यवतमाळ
तूर खरेदीच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील १३ केंद्रांवर सुमारे नऊ हजार शेतकरी मुक्कामी आहेत. मोजमाप होईल या आशेने ते रात्र जागून काढत आहेत. मात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये या शेतकऱ्यांसाठी साध्या पायाभूत सुविधांचाही अभाव आहे.
बाजार समित्यांना प्रती क्विंटल एक रुपया सेस (शुल्क) दिला जातो. यातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी विश्रामगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, शेतमालाची सुरक्षा, उपहारगृह, अत्यल्प दरात भोजन, गावापासून बैलगाड्यांनी शेतमाल घेवून येणाऱ्या जनावरांसाठी चारापाणी आदी व्यवस्था बंधनकारक आहे. परंतु दुर्दैवाने या सोयीसुविधांचा अभाव आहे. शेतकऱ्यांना शुद्ध तर दूर साधे पिण्याचे पाणीही मिळत नाही. प्रमुख बाजार समितीतच हे चित्र आहे, तर अन्य बाजार समित्यांमध्ये काय अवस्था असेल, याची यावरून कल्पना येते. शेतकऱ्यांमधून ओरड झाल्यानंतर यवतमाळ बाजार समितीने आता दोन दिवसांपासून पाणी व मसालेभाताची व्यवस्था केली आहे.
बाजार समित्यांमध्ये सोयीसुविधा नसल्याने शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात तुरीच्या गंजीवरच रात्र काढावी लागत आहे. त्याच्या खाण्यापिण्याचेही वांदे सुरू आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या संचालक मंडळ व प्रशासनाविरूद्ध शेतकरी वर्गात रोष पाहायला मिळतो आहे. बाजार समिती एक रुपया सेस घेते कशासाठी, असा प्रश्न संतप्त शेतकरी विचारत आहेत. मुक्कामी असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी ‘लोकमत’कडे आपल्या समस्यांना वाट मोकळी करून दिली.
मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना उघड्यावर शौचास गेले म्हणून दंड भरावा लागतो. यवतमाळ केंद्रावर २०० शेतकरी मुक्कामी आहेत. दिग्रसमध्ये २५० शेतकरी, उमरखेडमध्ये १५०, पुसदमध्ये ५८८, बाभूळगावत ५०, कळंबमध्ये ६६, पांढरकवड्यात ६००, दारव्हा येथे ८००, घाटंजीत ३००, मुकुटबनमध्ये १०० शेतकरी मुक्कामी आहेत. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

Web Title: Nine Thousand Farmer Pauses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.