निर्मल निर्गुडेचे काम युद्ध पातळीवर

By admin | Published: May 20, 2016 02:06 AM2016-05-20T02:06:42+5:302016-05-20T02:06:42+5:30

शहरासह परिसरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून सुरू झालेल्या ‘मिशन निर्मल निर्गुडे’चे काम लोकसभागातून युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.

Nirmal Niragude's work at the war level | निर्मल निर्गुडेचे काम युद्ध पातळीवर

निर्मल निर्गुडेचे काम युद्ध पातळीवर

Next

पाच मशीन, एक लोडर : २० ते २२ लाखांचा खर्च अपेक्षित
वणी : शहरासह परिसरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून सुरू झालेल्या ‘मिशन निर्मल निर्गुडे’चे काम लोकसभागातून युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. प्रत्यक्ष काम बघून समाजातील प्रत्येक घटकाचा यात सहभाग मिळत आहे. आता ही लोकचळवळ निर्माण होत आहे.
निर्गुडेच्या स्वच्छतेसाठी भरीव मदतीकरिता अनेकांनी सहभाग नोंदविला आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यात मिशन निर्मल निर्गुडाच्या योजनेसंदर्भात विचारमंथन करण्यात आले. प्रत्यक्ष पावसाळा सुरू व्हायला किमान १५ ते २० दिवसाचा अवधी आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन करून गणेशपूरच्या पुलापासून चिखलगावच्या पुलापर्यंत नदीचे खोलीकरण व रूंदीकरणाचे उद्दीष्ट १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी कामाला सुरूवात झाली.
पंप हाऊसजवळील मोठे खडक मशीनद्वारे फोडून नदीचे पात्र रूंद करून ते खोल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीत जादा जलसाठा सुरक्षित राहील. या कामासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून चिखलगाव पुलाजवळ पाच मशीन व एक लोडर, माती उचलण्यासाठी व नदीतील माती बाहेर फेकण्यासाठी पाच टिप्परची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी आमदार बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘मिशन निर्मल निगुर्डा’ समितीतर्फे बैठक घेण्यात आली. यावेळी निधी संकलन समितीचे गठन करण्यात आले. समितीत आमदार बोदकुरवार, राजाभाऊ पाथ्रडकर, डॉ.महेंद्र लोढा, राकेश खुराणा, रवी बेलुरकर, प्रा.महादेव खाडे, तर देखरेख समितीत सिद्दीक रंगरेज, अभिजित सातोकर, अभियंता दलाल, जलपूर्ती अभियंता गायकवाड, माजी मुख्याधिकारी कावटकर यांचा समावेश आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Nirmal Niragude's work at the war level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.