नितीन गडकरी बुधवारी यवतमाळ दौऱ्यावर

By admin | Published: November 24, 2015 05:28 AM2015-11-24T05:28:32+5:302015-11-24T05:28:32+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिन समारोहात उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ

Nitin Gadkari visits Yavatmal on Wednesday | नितीन गडकरी बुधवारी यवतमाळ दौऱ्यावर

नितीन गडकरी बुधवारी यवतमाळ दौऱ्यावर

Next

यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिन समारोहात उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी बुधवार २५ नोव्हेंबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर येत आहे. त्यांचे जवाहरलाल दर्डा विमानतळावर सकाळी ९.१० वाजता आगमन होईल.
सकाळी ९.३० ते १०.३० या वेळात ते प्रेरणास्थळावर उपस्थित राहून बाबूजींना आदरांजली अर्पण करतील. तेथून सकाळी ११ वाजता अ‍ॅग्लो हिंदी हायस्कूल गोदनी रोड येथील सत्कार समारोहाला उपस्थित राहणार आहे. त्यानंतर १२.४५ वाजता अभ्यंकर कन्या शाळेत राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांचे भूमिपूजन करणार आहे. दुपारी ३ वाजता यवतमाळ येथील भारी विमानतळावरून ते बंगळूरूकडे प्रयाण करणार आहे.

Web Title: Nitin Gadkari visits Yavatmal on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.