बालकामगार नाहीत, केवळ फलकांवर; अप्रत्यक्ष असतात कामावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:44 AM2021-08-22T04:44:35+5:302021-08-22T04:44:35+5:30
घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लहान वयातच मुलांना कामाला पाठविले जाते. मुलांना कामाला पाठवल्याने त्यांच्या ...
घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने व कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लहान वयातच मुलांना कामाला पाठविले जाते. मुलांना कामाला पाठवल्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होत नाही, शिवाय काही ठिकाणी धोकादायक स्थितीमध्ये काम करावे लागते. त्यामध्ये लहान मुलांचा जीव जाण्याची शक्यता असते. आर्थिक उत्पन्नासाठी लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा बालकामगार प्रतिबंधक कायदा १९८६ नुसार गुन्हा आहे. वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, हे या अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बालकामगारांना पकडून बालकल्याण समितीसमोर हजर केले जाते. समिती बालकामगारांची चौकशी करून त्यांना शाळेत पाठवण्याच्या अटीवर पालकांच्या ताब्यात देतात. ० ते १४ वर्षांखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतो. त्याचप्रमाणे तो, मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास हानिकारक मानले गेलेले १६ व्यवसाय व धोकादायक समजल्या गेलेल्या ६५ प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई करतो. नियमभंग करणाऱ्यांना ३ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंत तुरुंगवास व त्यासोबत १० ते २० हजार रुपये दंड होऊ शकतो. १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, हे या अधिनियमांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विशेषतः, १४ वर्षांखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानिकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतो. दोषींवर कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या किंवा तुरुंगवासाच्या शिक्षा देण्याच्या तरतुदीही त्यामध्ये आहेत; मात्र या अधिनियमाच्या कक्षेमधून कुटुंबे व प्रशिक्षण संस्थांना वगळण्यात आलेले आहे. शहरातील भागात व हद्दवाढीमध्ये अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी बांधकामांवर अनेक बालकामगार आढळून आले असून शहर व तालुक्यातील हद्दीत असलेल्या हॉटेल व चहा कॅन्टीन आदी ठिकाणी बालकामगार आढळून आले आहेत.