परजिल्ह्यात शेतमालास नो एन्ट्री; हळद, कापूस, भूईमुग अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 08:32 PM2020-05-25T20:32:37+5:302020-05-25T20:33:04+5:30

राज्य शासनाने शेतमाल विक्रीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. तरी स्थानिक शेतमाल घेण्यास इतर जिल्ह्यातील बाजार समित्या नकार देत आहेत. यामुळे हळद, कापूस आणि भूईमुग उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

No entry for farm produce in the district; Turmeric, cotton, groundnuts stuck | परजिल्ह्यात शेतमालास नो एन्ट्री; हळद, कापूस, भूईमुग अडकले

परजिल्ह्यात शेतमालास नो एन्ट्री; हळद, कापूस, भूईमुग अडकले

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य शासनाच्या आदेशाला केराची टोपली


लोकमत न्यूज नेटवर्क
रूपेश उत्तरवार
यवतमाळ : राज्य शासनाने शेतमाल विक्रीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. तरी स्थानिक शेतमाल घेण्यास इतर जिल्ह्यातील बाजार समित्या नकार देत आहेत. यामुळे हळद, कापूस आणि भूईमुग उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
शेतमाल विक्रीसाठी देशभरात कुठेही बंधने नाही. मात्र कोरोनामुळे नियमात फेरबदल झाले. यातून शेतमाल वगळण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली होती. यानंतरही जिल्ह्याबाहेरच्या बाजार समित्यांनी स्थानिक शेतमाल घेण्यास नकार दिला आहे.
हळद, भूईमुग आणि कापूस यवतमाळच्या बाहेर आणि काही शेतमाल यवतमाळात येण्यासाठी परवानगी मागितली जात आहे. मात्र शेतकऱ्यांचा शेतमाल सीमेवरच रोखला जात आहे. हळद आणि कापूस विक्रीकरिता हिंगणघाट बाजार समितीमध्ये चांगला दर मिळतो. तर कारंजा बाजार समितीमध्ये भूईमुगाला चांगला दर असतो. वधेर्चे शेतकरी भूईमुग विक्रीकरिता यवतमाळात येण्यासाठी तयार आहेत. तरी शेतमाल जिल्ह्यात येताना सीमेवर थांबविला जात आहे. त्याचप्रमाणे यवतमाळातून इतर जिल्ह्यात शेतमाल जाताना थांबविला जात आहे. इतर जिल्ह्यातील बाजार समित्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतमाल कोरोनामुळे घेण्यास नकार देत आहेत.

बाजार समित्यांचे सभापती म्हणतात...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आपल्या जिल्ह्यातील शेतमाल खरेदी होणार असल्याचे मत कारंजा बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके यांनी व्यक्त केले. हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीार कोठारी यांनी वर्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानंतरच इतर जिल्ह्यातील शेतमाल खरेदी करता येईल, असे मत नोंदविले.

शेतमाल घेण्यास आमचे कुठलेही निर्बंध नाही. शेतमाल विक्रीकरिता मुभा आहे. शेतकरी शेतमाल आणू शकतात.
- ऋषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

शेतमाल विक्रीसाठी कुठेही निर्बंध नाही. तो तर सर्व ठिकाणी विकता येतो. आमच्याकडून कुठलेही निर्बंध नाही.
- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

Web Title: No entry for farm produce in the district; Turmeric, cotton, groundnuts stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.