कर्जमाफीनंतरही कर्ज मिळाले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:15 PM2018-07-08T22:15:12+5:302018-07-08T22:16:35+5:30
भांबोऱ्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. मात्र नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत कर्जाचा गुंता सोडविण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : भांबोऱ्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. मात्र नव्याने कर्ज देण्यास बँकेने नकार दिला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत कर्जाचा गुंता सोडविण्याची मागणी केली.
भांबोरा येथील शेतकऱ्यांना विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि स्टेट बँक जवळाकडून कर्ज मिळाले. शेतकरी सन्मान योजनेत या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केला. त्यांना कर्जमाफ झाल्याचा मॅसेज मिळाला. यानंतर शेतकरी नव्याने कर्ज मिळविण्यासाठी या बँकेकडे गेले, तर या बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला. घाटंजीमधील बँकेकडे जाण्याच्या सूचना दिल्या. नव्याने कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांची पेरणी अडचणीत सापडली आहे. यामुळे भांबोऱ्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत नव्याने कर्ज देण्याची मागणी केली. यावेळी दिलीप राठोड, गुलाब राठोड, गोविंदा राठोड, प्रल्हाद चव्हाण, दत्ता राठोड, जितेश राठोड, जनाबाई राठोड, इंदल जाधव, लक्ष्मण मांजरे, नरेन्द्र लोखंडे, शांताबाई राठोड यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.