हात धुण्यासाठी पाणी नाही, कोरोनाशी लढणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:00 AM2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:18+5:30

अनेक दिवसांपासून जीवन प्राधिकरणाचे वेळापत्रक कोलमडले आहे. १० ते १५ दिवसापासून पाणीच नाही. आतापर्यंत निळोना प्रकल्पाची मुख्य पाईपलाईन तीनवेळा फुटली. अनेक ठिकाणी पाईपलाईन खोदून अर्धवट ठेवण्यात आली आहे. काम पूर्ण न करताच खोदलेले खड्डे बुजविण्यात आले. नळ आल्यावर हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहते. मात्र ते लिकेज महिना लोटला तरी दुरूस्त झाले नाही.

No water to wash hands, how to fight corona? | हात धुण्यासाठी पाणी नाही, कोरोनाशी लढणार कसे?

हात धुण्यासाठी पाणी नाही, कोरोनाशी लढणार कसे?

Next
ठळक मुद्देजीवण प्राधिकरणाचे पाणी मात्र रस्त्यावर : पाईपलाईनचे खोदकाम सुरूच, लिकेज न काढताच खड्डे बुजविले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पात मुबलक पाणी आहे. तरीही यवतमाळकरांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना खासगी बोअरवर रांगा लावाव्या लागत आहे. हात धुण्यासाठीही पाणी नाही. अशा स्थितीत कोरोनाशी दोन हात करायचे कसे, असा गंभीर प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.
अनेक दिवसांपासून जीवन प्राधिकरणाचे वेळापत्रक कोलमडले आहे. १० ते १५ दिवसापासून पाणीच नाही. आतापर्यंत निळोना प्रकल्पाची मुख्य पाईपलाईन तीनवेळा फुटली. अनेक ठिकाणी पाईपलाईन खोदून अर्धवट ठेवण्यात आली आहे. काम पूर्ण न करताच खोदलेले खड्डे बुजविण्यात आले. नळ आल्यावर हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहते. मात्र ते लिकेज महिना लोटला तरी दुरूस्त झाले नाही. दहीवलकर ले-आउट परिसरातील पाईपलाईन २० दिवसांपासून फुटली. विदर्भ हाऊसिंग सोसायटीमधील नागरिकांचे सर्वाधिक हाल आहे. विशेष म्हणजे, येथून जवळच मंत्री महोदयांचे कार्यालय आहे. तेथे नागरिक वारंवार जाऊन व्यथा मांडतात.
प्रभाग एक वंचित
यवतमाळ शहराचा प्रभाग क्रमांक एक हा पाणी वितरणाच्या यादीत शेवटच्या टोकावर आहे. या ठिकाणी सर्वात शेवटी पाणी येते. लवकरच नळ जातात. कॉटन मार्केट, धोबीघाट, तलाव फैल, मधुबन, केशव पार्क, नारंगेनगर, सुरेशनगर, गिरजानगर, चांदोरेनगर, मोहा भागात पाण्याची मारामार आहे. वेळेचे बंधन पाळलेच जात नाही.

नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
विदर्भ हाऊसिंग सोसायटीमधील माधुरी रापर्तीवार, रवि बुटले आणि रवी पोटे यांनी प्राधिकरणाच्या मनमानी कारभारावर चांगलाच रोष व्यक्त केला. साथरोग पसरत आहे. मात्र प्राधिकरण आणि नगरसेवकांना त्याची चिंता नाही. आम्हाला पाणी मिळावे, असे ते म्हणाले. राजू रापर्तीवार, मंगला व्यास यांनी नळाचे पाणी मुबलक प्रमाणात येत नाही. गडर लगतच्या पाईपलाईन लिक आहेत. यातून दूषित पाण्याचा धोका असल्याचे मत व्यक्त केले. गुरूदेव नगरातील राजेंद्र लाडेकर यांनी पिण्यासाठीही पाणी येत नाही, अशी खंत व्यक्त केली. कोरोनासारख्या रोगराईचा सामना करायचा कसा, असे ते म्हणाले. दहीवलकर ले-आऊटमधील पार्वताबाई पटेल पाईक यांनी पाणी सोडण्याची मागणी केली. अश्विनी ताम्हणे आणि जयश्री ताम्हणे यांनी पुरवठ्यातील खंडावर चिंता व्यक्त केली. शिंदे प्लॉटमधील छाया भास्करवार यांनी नळ वेळापत्रकानुसार सोडावे, असे मत व्यक्त केले. शंभु भुते यांनी १५ दिवसांनी रविवारी आलेले पाणी गढूळ असल्याचे सांगितले.

Web Title: No water to wash hands, how to fight corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.