गिट्टीक्रशरला ‘एनओसी’ने शेतकºयांची आत्मदहनाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 09:47 PM2017-09-18T21:47:03+5:302017-09-18T21:47:46+5:30

शेतातील पिके खराब होतात, जमिनीचा पोत बिघडतो, आरोग्यास धोका निर्माण होतो, त्यामुळे गिट्टीक्रशरला परवानगी देऊ नका, ....

NOC's 'self-esteem' notice to farmers in Gittiksharra | गिट्टीक्रशरला ‘एनओसी’ने शेतकºयांची आत्मदहनाची नोटीस

गिट्टीक्रशरला ‘एनओसी’ने शेतकºयांची आत्मदहनाची नोटीस

Next
ठळक मुद्दे‘ऊर्जाटेक’वर वाटखेड ग्रामपंचायत मेहरबान : धुरामुळे पिके खराब होतात, शेतीचा पोत बिघडतो, आरोग्य धोक्यात

के.एस. वर्मा । लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : शेतातील पिके खराब होतात, जमिनीचा पोत बिघडतो, आरोग्यास धोका निर्माण होतो, त्यामुळे गिट्टीक्रशरला परवानगी देऊ नका, ही वाटखेड येथील नागरिकांची विनंती ग्रामपंचायतीने ठोकरली. जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांपर्यंत प्रकरण पोहोचूनही परवानगी रद्द केली नाही. अखेर या गावातील आठ नागरिकांनी आत्मदहनाची नोटीस प्रशासनाला दिली आहे.
वाटखेड ग्रामपंचायतीने ऊर्जाटेक कंपनीच्या गिट्टीक्रशरला गतवर्षी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. भविष्यातील धोके लक्षात घेता गावकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. तत्कालीन जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने एनओसी रद्द केली होती. त्यानंतरचे दोन-तीन प्रयत्नही अयशस्वी झाले. यावर्षी ऊर्जाटेक कंपनीने पुन्हा जिल्हाधिकारीºयाकडे अर्ज केला. १५ आॅगस्ट रोजी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ग्रामसभेत प्रस्ताव पारित झाला. त्याविरूद्ध शेतकºयांनी पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनाद्वारे न्यायाची मागणी केली आहे.
२६ जानेवारी २०१६ ला झालेल्या ग्रामसभेतही ठराव पारित करण्यात आला होता. चौकशीत कोरम पूर्ण नसल्याने ग्रामसभा अवैध ठरली होती आणि जिल्हाधिकाºयांनी एनओसी रद्द केली होती. ८८० मतदार असलेल्या वाटखेडा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत १५ आॅगस्ट १७ ला १५२ सदस्य हजर होते. ४२ समर्थन, ११ विरोधात तर, १९९ तटस्थ राहिले होते. गिट्टीक्रशरला प्रचंड विरोध असतानाही एनओसी देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नामुळे नागरिकांत रोष आहे.
पीडित शेतकºयांनी नोंदविल्या तीव्र भावना
आमच्या शेतातील कापूस गिट्टीक्रशरच्या धुरामुळे आणि ये-जा करणाºया वाहनांच्या धुरामुळे दरवर्षी काळा पडतो. पºहाटी फुलावर येत नाही. तुर-सोयाबीनचा दाणा काळवंडतो, उत्पादन कमी होते. शेतमालाची प्रत बिघडल्याने नुकसान होत आहे.
- शांताबाई बावने
सन ११ ते १५ या चार वर्षाच्या काळात या गिट्टीक्रशरमुळे शेतकºयांचे बरेच नुकसान झाले आहे. त्याची प्रथम भरपाई देण्यात यावी. यापूर्वी शेतकºयांचे व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याच अटीवर ग्रामपंचायतीने एनओसी दिली होती.
- श्रावण वाकडे
गिट्टीक्रशरकडून दोनही बाजूस जाणारा मार्ग पक्का बांधून दिल्यास नुकसान होणार नाही.
- माधव बावने
सरपंचांचाही परवानगीला विरोध
शेतकºयांच्या विरोधात घेतलेल्या ठरावाला विरोध आहे. ग्रामसभेत आमिषे दाखवून काही लोक आणण्यात आली. या ग्रामसभेवर दबाव आणला गेला आहे. या ठरावावर सही करणार नाही आणि एनओसी देणार नाही, असे वाटखेडच्या सरपंच सुनंदा आत्राम यांनी सांगितले. आपण नागरिकांसोबत असल्याचे त्या म्हणाल्या.
गिट्टीअभावी कालव्याची कामे बंद
बेंबळा कालव्याच्या बांधकामाकरिता नागपूरच्या ऊर्जाटेक कंपनीने हा गिट्टीक्रशर उभारला आहे. चार वर्षे त्यामुळे उत्पादन करता आले. दोन वर्षापासून एनओसी न मिळाल्याने प्रकल्प बंद आहे व बेंबळा प्रकल्पाला गिट्टी चुरी पुरविता न आल्याने कॅनलची कामेही थांबली आहे, असे ऊर्जाटेकचे व्यवस्थापक शर्मा यांनी सांगितले.
सरपंचांचाही परवानगीला विरोध
शेतकºयांच्या विरोधात घेतलेल्या ठरावाला विरोध आहे. ग्रामसभेत आमिषे दाखवून काही लोक आणण्यात आली. या ग्रामसभेवर दबाव आणला गेला आहे. या ठरावावर सही करणार नाही आणि एनओसी देणार नाही, असे वाटखेडच्या सरपंच सुनंदा आत्राम यांनी सांगितले. आपण नागरिकांसोबत असल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: NOC's 'self-esteem' notice to farmers in Gittiksharra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.