स्कॅ्रप बसच्या बदल्यात नाममात्र पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 08:14 PM2020-06-19T20:14:24+5:302020-06-19T20:14:46+5:30

दहा लाख किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर एसटी बस स्क्रॅप (भंगारात) केली जाते. फारच फार झाले तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन लाख किलोमीटर वाढवून घेतले जाते. गेली अनेक वर्षांपासून नवीन बसेस यवतमाळ विभागाला अपवादानेच देण्यात आल्या आहे. गेली पाच ते सात वर्षांपासून ही गती अतिशय कमी आहे. इतर विभागात दीड-दोन लाख किलोमीटर वापरल्या जावू शकणाऱ्या बसेस यवतमाळ विभागाला मागील काही काळात देण्यात आल्या आहेत.

Nominal supply in exchange for scrap bus | स्कॅ्रप बसच्या बदल्यात नाममात्र पुरवठा

स्कॅ्रप बसच्या बदल्यात नाममात्र पुरवठा

Next
ठळक मुद्देफेऱ्यांवर परिणाम : उत्पन्नाची बाजू कमकुवत, प्रवाशांना करावा लागतो गैरसोयीचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) नियम पाळून एसटी बसेस भंगारात काढल्या जातात. त्या तुलनेत नवीन बसेस पुरविल्या जात नाही. पुरविल्या तरी एखाद्या विभागाने वापरलेल्या आणि वाढवून घेतलेल्या किलोमीटरच्या बसेस मस्तकी मारल्या जातात. याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत असल्याचे सांगितले जाते. सध्या लॉकडाऊनचा काळ असल्याने ही समस्या जाणवत नसली तरी इतर काळात मात्र तीव्रतेने दिसून पडते.
दहा लाख किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर एसटी बस स्क्रॅप (भंगारात) केली जाते. फारच फार झाले तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन लाख किलोमीटर वाढवून घेतले जाते. गेली अनेक वर्षांपासून नवीन बसेस यवतमाळ विभागाला अपवादानेच देण्यात आल्या आहे. गेली पाच ते सात वर्षांपासून ही गती अतिशय कमी आहे. इतर विभागात दीड-दोन लाख किलोमीटर वापरल्या जावू शकणाऱ्या बसेस यवतमाळ विभागाला मागील काही काळात देण्यात आल्या आहेत.
भंगारात निघालेल्या बसेसची संख्या वाढत असतानाच विभागाचे निर्धारित किलोमीटर पूर्ण होत नाही. बसचा तुटवडा असल्याने फेºया वाढविण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पर्यायाने प्रवासी एसटीपासून दूर जात असल्याची ओरड आहे. नियमित असलेल्या बसफेऱ्या एसटी उपलब्ध नसल्याने रद्द केल्या जातात. यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट येते. जुन्या बसेस मिळाल्याने अपेक्षित अ‍ॅव्हरेज मिळत नाही. इंधन खर्च वाढतो. भंगारात निघालेल्या बसेसच्या तुलनेत समप्रमाणात नवीन बसेस उपलब्ध करून दिल्यास उत्पन्न वाढण्यासोबतच प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे.

Web Title: Nominal supply in exchange for scrap bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.