जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘नॉन ओव्हन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी’ कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 09:51 PM2018-10-24T21:51:00+5:302018-10-24T21:52:14+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे नॉन ओव्हन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी कार्यशाळा घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे नॉन ओव्हन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी कार्यशाळा घेण्यात आली. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किनो अॅटोमेशन मुंबईचे सेल्स अँड मार्केटिंग हेड अमर सुर्वे, रिलायन्स इंडस्ट्रीज मुंबईचे बिझिनेस डेव्हलपमेंट जनरल मॅनेजर चंदन राऊत, जेडीआयईटीचे प्राचार्य डॉ. आर.एस. तत्त्ववादी, टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. गणेश काकड, शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या ड्रेस डिझाईनिंग व गारमेंट मॅन्यूफॅक्चरिंग विभागाच्या प्रा. अनघा गाढवे, प्रा. शीतल वनकर, कार्यशाळा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले उपस्थित होते.
यावेळी अमर सुर्वे यांनी टेक्सटाईल क्षेत्राचा प्रवास हा टेक्नीकल टेक्सटाईलच्या दिशेने वेगाने सुरू आहे, असे सांगितले. त्यातीलच एक भाग म्हणजे नॉन ओव्हन तंत्रक्षेत्राचा ज्यामध्ये केवळ तंतूपासून थेट कापडाची निर्मिती करता येते. ज्याचा वापर पाणी शुद्ध करावयाचे फिल्टर, पेट्रोल शुद्ध करावयाचे फिल्टर, वाहनांमधील रूफिंग, डॅशबोर्ड आदी कामांसाठी केला जातो. नवीन रक्तनलिका, कृत्रिम हृदय यासारख्या क्लिष्ट शस्त्रक्रियेदरम्यानसुद्धा केला जातो, असे ते म्हणाले. नॉन ओव्हन मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी या विषयातील उपयुक्तता, त्याचे फायदे आणि दैनंदिन जीवनातील वापर या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अमर सुर्वे हे जेडीआयईटीचे माजी विद्यार्थी आहेत.
चंदन राऊत यांनीही जेडीआयईटीतून शिक्षण घेतले आहे. त्यांनी आपल्या व्याख्यानातून टेक्नीकल टेक्सटाईल अँड नॉन ओव्हन या क्षेत्रातील रोजगार उपलब्धता व व्यवसायीकरण याविषयी माहिती दिली. उद्योग क्षेत्राशी निगडीत भविष्यातील संधी आणि नवीन उद्योगासाठी शासनाचे प्रोत्साहनपर अनुदान याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत जेडीआयईटीच्या टेक्सटाईल विभागाचे आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील ड्रेस डिझाईनिंग व गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ. आर.एस. तत्त्ववादी यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. प्रा. गणेश काकड यांनी प्रास्ताविक केले. संचालन रजत सोनी यांनी केले. कार्यशाळेसाठी प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, प्रा. प्रशांत रहांगडाले, कार्यशाळा समन्वयक प्रा. राम सावंत, प्रा. मोनाली इंगोले, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कैकाडे, पूनम लढ्ढा, विशाल सावंकर, आदित्य अनकमवार, केवीन पटेल, शुभम उरकुडे, मयूर महिंद्रकर, अश्विनी आवारे, प्रिया सिंगनधुपे, रूचा डहाके, चंदू चौगुले, अश्विनी वानखडे, शिफा कामिल, पायल पांड्या, मयूरी वाघ, मोनिका जीवतोडे, शिवम अडोले आदींनी पुढाकार घेतला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.