अहिंसा हाच सर्वात मोठा धम्म
By admin | Published: February 26, 2017 01:16 AM2017-02-26T01:16:41+5:302017-02-26T01:16:41+5:30
प्रत्येकाचे मन मारून इच्छेविरुद्ध केलेले कोणतेही कृत्य हे हिंसेत मोडते. म्हणून तथागत गौतम बुद्धांनी अहिंसेचा सर्वात मोठा धम्म सांगितला.
पूज्य भंते : महागाव येथे जागतिक धम्म परिषदेचे आयोजन
महागाव : प्रत्येकाचे मन मारून इच्छेविरुद्ध केलेले कोणतेही कृत्य हे हिंसेत मोडते. म्हणून तथागत गौतम बुद्धांनी अहिंसेचा सर्वात मोठा धम्म सांगितला. त्यांचा उपदेश आपण अंगीकारावा अशी नम्र प्रार्थनाच पूज्य भंते यांनी केली.
महागाव येथे दोन दिवसीय जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केली आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी शनिवारी पहिल्या सत्रात पूज्य भंते उपदेश करीत होते. सकाळी १० वाजता त्यांच्या हस्ते पंचशील ध्वाजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत उपस्थित नागरिकांसमोर पूज्य भंते यांनी धम्माचा उपदेश केला. यावेळी नागरिकांची धम्म परिषदेला मोठी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)