नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुखासह कर्मचाºयांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:05 PM2017-11-14T23:05:46+5:302017-11-14T23:05:57+5:30
येथील नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजाची संपूर्ण घडी विस्कटलेली आहे. कर्मचाºयांवर कुणाचेच नियंत्रण नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजाची संपूर्ण घडी विस्कटलेली आहे. कर्मचाºयांवर कुणाचेच नियंत्रण नाही. ही बाब खुद्द मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी अकस्मात भेट दिल्यानंतर आरोग्य विभाग प्रमुखासह चार कर्मचाºयांना नोटीस बजावली.
सफाई कामगार सकाळी वेळेवर कामावर येत नाहीत. त्यांची कामाची वेळ सकाळी ६ ते १० आणि सकाळी १०.३० ते २ अशी करण्यात आली. मात्र अनेक कर्मचारी वेळवर येत नाही. परिणामी शहर स्वच्छतेचे काम होत नाही. कर्मचारी वेळेवर न आल्यास आरोग्य निरीक्षकासह विभाग प्रमुखाला जबाबदार धरले जाईल, अशी तंबी मुख्याधिकाºयांनी दिली होती. त्यानंतरही कामकाजात बदल न झाल्यामुळे त्यांनी मंगळवारी सकाळी सर्व कर्मचाºयांची झाडाझडती घेतली. यात सफाई कामगार गैरहजर आढळले. या प्रकरणी आरोग्य विभाग प्रमुख संदीप गायकवाड, आरोग्य निरीक्षक प्रफुल जनबंधून यांच्यासह चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
कॅरीबॅग वापरणाºयांना चार हजारांचा दंड
मुख्याधिकाºयांनी कॅरीबॅग निर्मूलन मोहीम हाती घेतली. आर्णी मार्गावर कॅरीबॅगमध्ये वस्तू विकणाºयांवर कारवाई करीत दंडादाखल चार हजार रूपये वसूल केले. यावेळी आरोग्य निरीक्ष राहुल पळसकर, प्रदीप बोपचे, कुणाल चव्हाण, गोपाल अवधूत, अंबादास डंभारे आदी उपस्थित होते. मुख्याधिकाºयांनी नागरिकांना कॅरिबॅग न वापरण्याचे आवाहन केले आहे.