दहा नगरांमध्ये डासांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:58 PM2018-10-01T21:58:29+5:302018-10-01T21:59:03+5:30

डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर हिवताप विभागाने यवतमाळ शहरात कीटक सर्वेक्षण केले असता दहा नगर-कॉलण्यांमध्ये डासांचे प्रमाण (घनता) सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे.

The number of mosquitoes in ten cities is more | दहा नगरांमध्ये डासांची संख्या अधिक

दहा नगरांमध्ये डासांची संख्या अधिक

Next
ठळक मुद्देहिवताप विभागाचा अहवाल : कीटक सर्वेक्षण, डेंग्यूचे संकट कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर हिवताप विभागाने यवतमाळ शहरात कीटक सर्वेक्षण केले असता दहा नगर-कॉलण्यांमध्ये डासांचे प्रमाण (घनता) सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे.
सर्वाधिक डास असलेल्या क्षेत्रामध्ये बांगरनगर, शिरभाते ले-आऊट, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, अग्रवाल ले-आऊट, चिंतामणी ले-आऊट, आदर्शनगर, विठ्ठलवाडी, डोर्लीपुरा, वंजारीफैल आदी नगरांचा समावेश आहे. येथील डासांची घनता ही पाच ते सात पेक्षाही (१५ मिनिटात आढळणारे डास) अधिक आहे. यामुळेच शहरात दिवसागणिक डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे.
सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडताच डेंग्यूची सुरूवात झाली. डेंग्यूचा डांस हा स्वच्छ पाण्यात वाढत असल्याने शहरातील स्वच्छ व साफसफाई असलेल्या परिसरामध्ये या डांसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. हिवताप विभागाकडून डांसाची घनता मोजण्यासाठी एकक वापरले जाते. साधारणत: १५ मिनिटाच्या कालावधीत किती डास सापडतात यावरून ही घनता मोजली जाते. तीन पेक्षा अधिकची घनता ही धोकादायक समजली जाते. प्रत्यक्षात डेंग्यूच्या एडीसएजीप्ट या डांसाची घनता ही पाच ते सातच्यावर आढळून आली. स्थिती धोकादायक असल्याचा अहवाल हिवताप विभागाने दिला. हिवताप विभागाचे शहरात १० कीटक सर्व्हेक्षक आहेत. त्याच्याच अहवालातून हे धक्कादाय वास्तव पुढे आले आहे. मान्सूनपूर्व कार्यक्रमांतर्गत हिवताप विभागाने पाच हजारांवर रक्त नमुने गोळा केले आहे. खासगी रुग्णालयांमधून १२०० वर रक्त नमुने तपासण्यात आले आहे. यातील ४६ नमुने पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. अनेक ठिकाणी खासगीत केवळ पेशींच्या संख्येत घट आल्यामुळे थेट डेंग्यूचा उपचार केला जात आहे. यावर नियंत्रणाची गरज आहे.
आरोग्य विभागाची शहरात संयुक्त मोहीम
डेंग्यूचा प्रकोप थांबविण्यासाठी नगपरिषद आरोग्य विभागाने आता संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये एमपीडब्ल्यू, एएनएम, आशा स्वयंसेविका आणि सफाई कामगार यांचे पथक तयार केले आहे. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र पथक कार्यरत असून घरोघरी जावून जनजागृती करणार आहे. याशिवाय केमीफॉस अ‍ॅक्टीव्हीटी राबविणार आहे. आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस म्हणून सक्तीने पाळला जाणार आहे. वाढीव क्षेत्रातील अनेक खुल्या प्लॉटमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहेत. येथेही मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. यावर नियंत्रणासाठी साचलेले पाणी वाहते करण्याची सूचना केली आहे.

Web Title: The number of mosquitoes in ten cities is more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.