यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णसंख्येने ओलांडला २० हजारांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 03:42 PM2021-03-13T15:42:55+5:302021-03-13T15:43:33+5:30

Yawatmal News कोरोना संसर्गाची तीव्रता गंभीर वळणावर असून वयोगटाचा कुठलाही परिणाम यावर दिसत नाही. तरुणांचाही कोरोनाने मृत्यू होत असल्याचे आता दिसत आहे.

The number of patients in Yavatmal district has crossed the 20,000 mark | यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णसंख्येने ओलांडला २० हजारांचा टप्पा

यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णसंख्येने ओलांडला २० हजारांचा टप्पा

Next
ठळक मुद्देकोरोना महामारीची वर्षपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाचे संकट वर्षभरानंतरही कायम आहे. १२ मार्चला जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. योगायोग म्हणजे १२ मार्च २०२१ ला जिल्ह्यात ३६५ कोरोना रुग्ण आढळले. ३६५ दिवसांत कोरोनाचा धोका अधिकच वाढला आहे. या वर्षभरात ४९८ जणांनी आपला जीव गमावला आहे. कोरोना संसर्गाची तीव्रता गंभीर वळणावर असून वयोगटाचा कुठलाही परिणाम यावर दिसत नाही. तरुणांचाही कोरोनाने मृत्यू होत असल्याचे आता दिसत आहे.

मार्च २०२० ते मे २०२० या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यू नव्हता. आरोग्य यंत्रणेने आलेल्या रुग्णांना योग्य उपचाराने वाचविण्याचे प्रयत्न केले. ठरावीक क्षेत्रापुरता मर्यादित असलेला कोरोना आता संपूर्ण जिल्हाभर फैलावला आहे. सुरुवातीला जिल्ह्यात २५ प्रतिबंधित क्षेत्रे होती. आता याची संख्या शेकडोंच्या घरात गेली आहे. लाॅकडाऊन, शारीरिक अंतर राखणे, यासारख्या उपाययोजना वर्षभरानंतर कोरोना नियंत्रणासाठी तुटपुंज्या ठरत आहे. व्यवसाय बुडाल्याने लाॅकडाऊनला आता उघडउघड विरोध होत आहे. त्यामुळे प्रशासनाने सुपर स्प्रेडरवर लक्ष केंद्रित करून चाचण्या वाढविल्या आहे. तसतसे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हेही वर्ष दहशतीत जाणार काय, अशी शक्यता आहे.

औषधांची भासते चणचण

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणारे रेमडिसिव्हिअर हे इंजेक्शन शासकीय रुग्णालयात आता पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. वारंवार मागणी करूनही शासनस्तरावरून याचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत.

कोविड सेंटर्स पुरेसे आहेत का?

- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताच जानेवारीमध्ये बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर आता पुन्हा सुरू झाले आहे.

- ३८ कोविड केअर सेंटरसोबतच आणखी खासगी जागेचे अधिग्रहण करून उपचाराची व्यवस्था करण्यात येत आहे.

पहिला पाॅझिटिव्ह सध्या काय करतोय

- दुबई येथून महाराष्ट्रात आलेल्या ४० प्रवाशांपैकी तिघे जण यवतमाळ जिल्ह्यातील होते. हे तिघेही कोरोना पाॅझिटिव्ह होते.

- एकाच कुटुंबातील कोरोना पाॅझिटिव्ह असलेले पहिले रुग्ण ठणठणीत असून आपली दैनंदिन कामे पार पाडत आहेत.

- ६५ वर्षीय पहिल्या कोरोना रुग्णाने यशस्वी मात केली असून त्यांचे किरकोळ आजारही दूर झाल्याचे सांगतात.

Web Title: The number of patients in Yavatmal district has crossed the 20,000 mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.