नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By admin | Published: July 15, 2014 12:13 AM2014-07-15T00:13:57+5:302014-07-15T00:13:57+5:30

जिल्हा परिषद आणि राज्य सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनस्तरावर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा काढून प्रशासनाप्रती असलेला रोष व्यक्त केला.

Nurses and health workers' front | नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा

नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Next

प्रशासनावर रोष : आकृतीबंधानुसार पदभरतीची मागणी
यवतमाळ : जिल्हा परिषद आणि राज्य सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनस्तरावर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा काढून प्रशासनाप्रती असलेला रोष व्यक्त केला.
आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राला वाढीव मनुष्यबळाची तरतूद केली. या दोन्ही ठिकाणी नवीन पदे निर्माण करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र पदभरती संदर्भात कुठलीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा बोझा पडत आहे. ग्रामीण आरोग्य अभियानातील नर्सेसना कायमस्वरुपी नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. आरोग्य सेवक पुरुष व आरोग्य सहायक यांची वेतनश्रेणी सारखीच आहे. या विभागातील आरोग्य सहायक औषध निर्माण अधिकारी यांची वेतन त्रूटी दूर करण्याची गरज आहे. आरोग्य केंद्रात दोन आरोग्य सहायक स्त्री आणि तालुका आरोग्य कार्यालयात एक आरोग्य सहायक स्त्री यांची पदे मंजूर करणे, कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करणे, कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार विभाग स्तरावर देणे, नियमित पदोन्नत्या करणे, डाटा एंट्री आॅपरेटरचे वेतन नियमित करणे, ग्रामीण आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरुपी सांभाळून घेणे, आजही आरोग्य विभागात दहा हजार पदे रिक्त असतानाही पदभरती प्रक्रिया घेतली जात नाही. शासनाने या मोर्चाची दखल न घेतल्यास २१ जुलैपासून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलनाचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर जिल्हा परिषदेवर धडक देण्यात आली. या वेळी आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, एम.ए. कय्यूम, प्रमोद इंगळे, अशोक राऊत, अरुण डवरे, रमेश आवटे, दादाराव बडे, विजय बुटके, शुभांगी गावंडे, जयदेव पाटील, अलका घावडे, विलास वानखडे, वाय.एम. सैयद, देवानंद रचकुंटवार, पुरुषोत्तम जाधव, जयवंत करोडदेव, सुभाष वानरे, अनिल परचाके आदी उपस्थित होते.
(शहर वार्ताहर)

Web Title: Nurses and health workers' front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.