अधिष्ठातांविरोधात नर्सेसचे कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 09:30 PM2019-01-22T21:30:09+5:302019-01-22T21:30:23+5:30
अधिपरिचारिकांच्या बदलीचे आदेश येऊनही त्यांना कार्यमुक्त केले नाही. यामुळे अधिष्ठातांच्या निर्णयाविरोधात नर्सेसनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या नेतृत्वात मंगळवारपासून येथील तिरंगा चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अधिपरिचारिकांच्या बदलीचे आदेश येऊनही त्यांना कार्यमुक्त केले नाही. यामुळे अधिष्ठातांच्या निर्णयाविरोधात नर्सेसनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या नेतृत्वात मंगळवारपासून येथील तिरंगा चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
३ नोव्हेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार १७ परचारिकांची बदली करण्यात आली. मात्र त्यांना कार्यमुक्त केले नाही. यामुळे या नर्सेसचे कुटुंब अडचणीत सापडले आहे. या नर्सेस सहा वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयात काम करीत आहेत. त्यांच्या विनंती बदल्यांना मंजुरी मिळाल्यानंतरही अधिष्ठातांनी जाणीवपूर्वक रोखल्याचा आरोप आहे.
आंदोलनात संघटनेच्या अध्यक्ष शोभा खडसे, उपाध्यक्ष छाया मोरे, सरचिटणीस नंदा साबळे, परिचारिका स्वाती कानडे, लिना राऊत, शुभांगी इरावार, पायल उईके, प्रिती गवई, शितल परदेशी, विष्णू राठोड, मनिषा बावने यांचा समावेश आहे.