पोषण आहारात गरोदर महिला, बालकांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:50 AM2021-09-07T04:50:57+5:302021-09-07T04:50:57+5:30

पांढरकवडा : गरोदर व स्तनदा मातांसह सहा वर्षांखालील मुलांसाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांतर्गत पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. तालुक्यातील ...

Nutritional diet of pregnant women, child mockery | पोषण आहारात गरोदर महिला, बालकांची थट्टा

पोषण आहारात गरोदर महिला, बालकांची थट्टा

Next

पांढरकवडा : गरोदर व स्तनदा मातांसह सहा वर्षांखालील मुलांसाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांतर्गत पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. तालुक्यातील वस्तुस्थिती जाणून घेतली असता धक्कादायक बाब पुढे आली. लाभार्थ्यांना दिला गेलेला पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असून भेसळयुक्त असल्याचे पाहणीत दिसून आले.

हा आहार आपल्या मुलांना कसा खाऊ घालू, असा सवाल तालुक्यातील एका लाभार्थीने केला. काही वेळा हा पोषण आहार अतिशय निकृष्ट असल्याने आम्ही आहारात न वापरता जनावरांना खाऊ घालतो, असेही काही लाभार्थ्यांनी सांगितले. पोषण आहाराअंतर्गत तेलाचे वाटप केले जाते; परंतु काही ठिकाणी गेल्या काही महिन्यांत लाभार्थ्यांना तेलाचे वाटप झाले नसल्याचे दिसून आले.

दर महिन्याला पोषण आहार न देता एका महिन्याचा पुरवठा करून दोन महिन्यांच्या स्वाक्षऱ्या पुरवठा रजिस्टरवर घेण्यात आल्याचे काही ठिकाणी दिसून आले. जे सुशिक्षित नागरिक आहेत, त्यांना वेळेवर व चागले पूर्ण साहित्य देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. १ ते ७ सप्टेंबर हा पोषण आहार सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहातच हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

मुलांना पोषण आहार मिळावा, शाळेची ओढ लागावी म्हणून बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून या पोषण आहाराचा पुरवठा महाराष्ट्र कन्झुमर्स फेडरेशनतर्फे केला जातो. यात तांदूळ, गहू, मिरची पावडर, हळद, मूगडाळ, मीठ, साखर दिले जाते. या वस्तूंबाबत काही लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची प्रत्यक्ष शहानिशा केली असता या तक्रारींमध्ये सत्यता आढळून आली. बहुतांश अंगणवाडीत हा प्रकार असल्याचे ‘रिऑलिटी’ चेकमधून पुढे आले.

बॉक्स

लाभार्थी म्हणतात...

पोषण आहारामध्ये चणा, मूग डाळ, गहू, हळद, मीठ, तांदूळ, तिखट येत आहे. मूग डाळ ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून खाण्यायोग्य नाही. गव्हामध्ये सुद्धा माती, खडे, सोंडे आहेत. मिरचीला चव नसून फक्त पाकिटे दिसायला आकर्षक आहेत. या वस्तू खाण्यायोग्य नाहीत. याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर हाेतो. तिखट तर कधी कधी फेकूनच देतो.

-मल्लिक अल्लंवार, लाभार्थी

बॉक्स

अंगणवाडी सेविकांवर दबाब

पुरवठादाराकडून पोषण आहाराचा जो पुरवठा करण्यात येतो, तो पाकीट बंद असतो. तो तसाच लाभार्थ्यांना वाटप करावा लागतो. पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी काही वेळा आल्या. याबाबत आम्ही वरिष्ठांना कळविले असता आमच्यावर दबाव आला.

एक अंगणवाडी सेविका

बॉक्स

अंगणवाड्यामध्ये निकृष्ट दर्जाचा आहार असून भेसळयुक्त, कमी वजन असल्याचे पोषण आहाराचा पुरवठा होत असल्याची तक्रार महिला व बालविकास विभागाकडे दोन महिन्यांपर्वी करण्यात आली; परंतु त्यावर कोणतीही कारवाई अथवा चौकशी करण्यात आली नाही. परिणामी, भेसळीचे प्रमाण वाढले आहे.

-संतोष बोडेवार, माजी सभापती, पं. स. पांढरकवडा.

Web Title: Nutritional diet of pregnant women, child mockery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.