पीक कर्जाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेला जड

By admin | Published: March 21, 2016 02:12 AM2016-03-21T02:12:09+5:302016-03-21T02:12:09+5:30

आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा बँक असमर्थ असून तसे पत्र

The objective of the crop loan is to make the district bank heavy | पीक कर्जाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेला जड

पीक कर्जाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेला जड

Next

यवतमाळ : आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा बँक असमर्थ असून तसे पत्र बँकेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. बँकेची वसुली नसल्याने ७१९ कोटी ७७ लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांना वितरित करणे अशक्य असल्याचे या पत्रात म्हटले आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जासाठी इतर बँकांकडे धाव घ्यावी लागणार आहे.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत कर्ज वाटपासंदर्भात बँकर्स कमिटीची बैठक बुधवार १६ मार्च रोजी येथील जिल्हाधिकराी कार्यालयात पार पडली. या बैठकीत खरीप हंगामात १ हजार ७९० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा बँकेला देण्यात आले. यात सर्वाधिक कर्ज वाटपाची जबाबदारी यंदा राष्ट्रीयकृत बँकांवर सोपविण्यात आली. त्या खालोखाल जिल्हा बँकेला कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले. यंदा ७१९ कोटी ७७ लाख रुपये जिल्हा बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले. परंतु या बँकेने आत्ताच हात वर केले आहे. कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास आम्ही असमर्थ असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र दिले आहे.
जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळ पडत आहे. अशा स्थितीत गतवर्षी कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. त्यानंतर शेतकरी कर्जास पात्र ठरले होते. यावर्षी राज्य शासनाने दुष्काळी जिल्ह्याच्या यादीतून यवतमाळ जिल्ह्याला बाद केले आहे. परिणामी कर्जाचे पुनर्गठण होणार नाही, अशा स्थितीत शेतकऱ्यांजवळ एक छदामही नाही. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात जिल्हा बँकेची कर्ज वसुली झाली नाही. कर्ज वसुली नसल्याने जिल्हा बँकेची परिस्थिती हलाखीची झाली असल्याचे म्हटले आहे. गत वर्षी ११ हजार ३७८ शेतकऱ्यांनी ७० कोटी १५ लाख रुपयांची परतफेड केली. इतर शेतकरी कर्ज भरू शकले नाही. त्यामुळे आम्ही कर्ज वाटपास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे राज्य बँक कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला अतिरिक्त पैसा द्यायला तयार नाही. त्यामुळे हे उद्दीष्ट पूर्ण होण्यास अडचणी येत आहे.
जिल्हा बँकेने पाठविलेल्या या पत्रावर विचार करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधकांना करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात त्यावर जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपाचे धोरण ठरणार आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना यावर्षीही पुन्हा बँकांचे उंबरठे झिजवावे लागेल. (शहर वार्ताहर )

४जिल्हा मध्यवर्ती बँकेला पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दीष्ट निम्मे करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. ७१९ कोटी ७७ लाखांऐवजी ३७५ कोटी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट करावे असे या पत्रात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या बँकेनेच उद्दीष्ट निम्मे करण्याची मागणी केली तर राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना काय कर्ज देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवीन सभासदांना कर्ज मिळणार नाही
४जुन्या सभासदांनी कर्जाची परतफेड केली नाही, त्यामुळे बँक आर्थिक अडचणीत आली आहे. अशा स्थितीन नवीन सभासदांना कर्ज द्यायचे कोठून असा प्रश्न जिल्हा बँकेपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर्षीही नवीन सभासदांना जिल्हा बँकेकडून एक छदामही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: The objective of the crop loan is to make the district bank heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.