माती परीक्षणाचे उद्दिष्ट दिले, यंत्रणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:28 PM2018-02-10T23:28:47+5:302018-02-10T23:29:00+5:30

शेतजमिनीचे आरोग्य तपासण्याची मोहीम देशपातळीवर राबविली जात आहे. मोहिमेला गती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला माती तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Objective of soil testing, no mechanism | माती परीक्षणाचे उद्दिष्ट दिले, यंत्रणा नाही

माती परीक्षणाचे उद्दिष्ट दिले, यंत्रणा नाही

googlenewsNext
ठळक मुद्दे६० हजार नमुन्यांचे टार्गेट : वर्षभरात केवळ पाच हजार नमुने तपासले

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतजमिनीचे आरोग्य तपासण्याची मोहीम देशपातळीवर राबविली जात आहे. मोहिमेला गती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला माती तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र त्यासाठी लागणारी यंत्रणाच माती परीक्षण प्रयोगशाळेकडे उपलब्ध नाही. यामुळे माती परीक्षणाची मोहीमच प्रभावित झाली आहे.
जिल्ह्यात मार्च २०१८ पर्यंत ६० हजार ८२ नमुने तपासन्याचे उद्दिष्ट माती परीक्षण प्रयोगशाळेला देण्यात आले होते. प्रत्यक्षात माती परीक्षण प्रयोगशाळेला १३ हजार ५०० नमुने पोहचते झाले. यातील पाच हजार नमुन्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
मात्र इतर नमुने तपासण्यासाठी कृषी विभागात मनुष्यबळच नाही. गुलाबी बोंडअळी आणि इतर तपासण्यामध्ये कृषी विभागातील कर्मचाºयांना माती परीक्षणाचे नमुने तपासण्यासाठी वेळच मिळाला नाही. यातून माती परीक्षणाचे नमुने तपासण्याचे काम खोळंबले आहे.
२९ मिनी लॅबमध्ये मातीचे नमुने जिल्ह्याच्या प्रयोगशाळेला तपासावे लागणार आहे. दीड महिन्यात उर्वरित नमुने तपासायचे कसे, हे आव्हान प्रयोगशाळेपुढे उभे ठाकणार आहे. आता रबी हंगाम संपून शेतकरी उन्हाळ्यात खरिपाच्या तयारीला लागतील. मात्र यावर्षी त्यांना मातीची माहितीच मिळाली नसल्याने कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न आहे.
जमिनीचे आरोग्यच कळणार नाही
माती परीक्षणातून कुठला घटक कमी आहे, याची माहिती शेतकºयांना मिळते. मात्र मातीचे नमुने घेण्याचे कामच संथगतीने सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतजमिनीचा पोत कसा आहे, त्यासाठी काय करावे, याची माहितीच शेतकऱ्यांना नाही. यातून पिकाचे उत्पादन घटले आहे.
नत्राची मोठी गरज
जिल्ह्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुन्यांमधून नत्राची कमतरता पुढे आली आहे. जमिनीचा सामू (सुपीकता) वाढला आहे. झिंकची कमतरता आहे. या खताचे व्यवस्थापन सेंद्रीय पद्धतीने केल्यास उत्पादन वाढण्यास मोलाची मदत होणार आहे.

Web Title: Objective of soil testing, no mechanism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.