‘वायपीएस’मध्ये पदग्रहण सोहळा
By admin | Published: July 3, 2017 02:03 AM2017-07-03T02:03:39+5:302017-07-03T02:03:39+5:30
यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये चारही सदनाचे कर्णधार आणि उपकर्णधारांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये चारही सदनाचे कर्णधार आणि उपकर्णधारांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. चेतक, पुष्पक, विक्रांत आणि गजराज या चार सदनाच्या प्रतिनिधींनी पदाची शपथ घेतली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कोल्हटकर उपस्थित होते.
निवड प्रक्रियेद्वारे प्रतिनिधींची निवड करण्यात आली. सदनाचे कर्णधार व उपकर्णधार असे आहेत. चेतक सदन - मोहम्मद बॉम्बेवाला, ओम तिवस्कर, गजराज सदन - प्रणव हिंदोचा, दृष्टी दोषी, पुष्पक सदन - हर्ष खसाळे, दिवा माखेसाना, विक्रांत सदन - यश पार्लीकर, समृद्ध राऊत. शिक्षकांनी केलेल्या मतदानातून हेड बॉय म्हणून श्रीमय दीक्षित व हेड गर्ल म्हणून ऋतुजा बाहेती याची निवड झाली आहे. क्रीडा कर्णधार म्हणून गौरी विजयकर यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांमधून अनुराग झंवर याची निवड झाली आहे.
निवड झालेल्या सर्व प्रतिनिधींना बॅच देवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी पद आणि जबाबदारीची शपथ दिली. यावेळी मंचावर प्रमुख पाहुण्यांसह समन्वयक अर्चना कढव, रूक्साना बॉम्बेवाला, प्रज्ञा पोहेकर, निशा जोशी, सीसीए प्रमुख अमोल चन्नूरवार उपस्थित होते.
पदग्रहण सोहळ्यात शिक्षकांची नियुक्ती सदन प्रमुख म्हणून करण्यात आली. चेतक सदनाचे प्रमुख उमाकांत रोडे व वैशाली जवादे, गजराज सदन - दिनेश जयस्वाल, धनश्री तंबाखे, पुष्पक सदन - अजय सातपुते, वृषाली दुग्गड, विक्रांत सदन उमेश कर्णेवार व शीतल सवई.
या कार्यक्रमात शाळेचा नावलौकिक करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. दहावीची विद्यार्थिनी पूर्वा बोधलकर हिची निवड राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघात झाली. आठवीची विद्यार्थिनी समृद्धी राऊत हिने अमरावती आयडॉल नृत्य स्पर्धेत द्वितीय स्थान प्राप्त केले. या स्पर्धेत ती रोख ४२ हजार रुपयांच्या बक्षिसाची मानकरी ठरली आहे. याबद्दल सदर दोघींना सन्मानित करण्यात आले. गतवर्षीचा प्रथम विजेता संघ विक्रेता संघ धोषित करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक अमोल चन्नूरवार, संचालन प्रिया वीरमल्लीवार व योगीता कडू यांनी, तर आभार उमाकांत रोडे यांनी मानले. पथसंचलन प्रवीण कळसकर व सुदर्शन महिंद्रे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. सदनाचे नवनियुक्त कर्णधार व उपकर्णधारांचे शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास आदींनी कौतुक केले.