वणीत फुटपाथवर व्यावसायिकांचा कब्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 10:26 PM2018-05-03T22:26:12+5:302018-05-03T22:26:12+5:30
शहरामध्ये काही मुख्य रस्त्याच्या कडेला पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बांधण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथवर पादचाºयांना पाय ठेवण्याचीही मुभा राहिली नाही. व्यावसायिकांनीच या फुटपाथवर ताबा मिळविला असून पालिकेने जणू हे फुटपाथ व्यावायीकांसाठीच बांधले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शहरामध्ये काही मुख्य रस्त्याच्या कडेला पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बांधण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथवर पादचाºयांना पाय ठेवण्याचीही मुभा राहिली नाही. व्यावसायिकांनीच या फुटपाथवर ताबा मिळविला असून पालिकेने जणू हे फुटपाथ व्यावायीकांसाठीच बांधले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वणी शहरातील बहुतांश रस्ते ५० वर्षापूर्वीच्या लोकसंख्येच्या अनुमानाने तयार करण्यात आले होते. गेल्या ५० वर्षात लोकसंख्या कितीतरी पटीने वाढली. मात्र रस्ते तेवढच आहे. अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरही अतिक्रमणाची स्पर्धा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पादचाºयांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याने या वर्दळीतून पादचाºयांना त्रास होऊ नये, म्हणून रस्त्याच्या कडेला फुटपाथची निर्मिती करण्यात आली. मात्र आता एकही फुटपाथ पादचाºयांना वापरण्यासाठी मोकळा राहिला नाही. अनेक फुटपाथवर किरकोळ दुकाने उभी करण्यात आली आहे. यापलिकडेही व्यावसायीक फुटपाथच्या पलिकडे रस्त्यावर दुकानातील वस्तू मांडतात. त्यामुळे रस्तेही अरूंद झाले आहेत. रस्त्यावरून जाणाºया एखाद्या व्यक्तीची सायकल किंवा दुचाकी जर फुटपाथवरील वस्तूला लागली, तर संबंधित दुकानदार सायकल किंवा दुचाकीचालकांशी वादावादी करण्यासही मागेपुढे पाहत नाही.
त्यामुळे फुटपाथ व्यावसायीकांसाठी की जनतेसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र नगरपालिका याप्रकरणी ‘नरो वा, कुंजरो वा’ ची भूमिका घेत आहे. फुटपाथ जनतेसाठी खुले करून देण्याची तसदी पालिका प्रशासनामध्ये राहिली नाही. एवढेच नव्हे तर या व्यावसायीकांकडून गुजरी ठेकेदार दररोज वसुली करून त्यांना संरक्षण देत आहेत. मात्र या वसुलीची पावतीसुद्धा व्यावसायीकांना दिली जात नाही. यामुळेच शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होण्याच्या घटना दिवसातून अनेकदा घडत असतात. शहरात काही रस्त्यांवर एकमार्गी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र एकमार्गी वाहतूक असणारे रस्तेही अतिक्रमणाने वेढले आहेत.
या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याची तसदी वाहतूक पोलिससुद्धा घेताना दिसत नाही. फुटपाथवरील दुकाने त्यासमोर दुकानदारांचे सामान व त्यासमोर ग्राहकांच्या दुचाकी उभ्या असल्याने रस्ता शिल्लक राहत नाही. येथील गांधी चौक हा शहराचा आत्मा समजला जातो. मात्र या चौकात सर्वाधिक अतिक्रमण झाले आहेत. रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यावर एकमार्गी रस्ता असतानाही चारचाकी वाहने काढताना कसरत करावी लागते.