नत्थू महाराजांच्या कार्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
By admin | Published: July 5, 2017 12:15 AM2017-07-05T00:15:14+5:302017-07-05T00:15:14+5:30
तालुक्यातील देऊरवाडा येथील पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते नत्थूजी महाराज चिखलकर यांनी आधारकार्ड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यातील देऊरवाडा येथील पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते नत्थूजी महाराज चिखलकर यांनी आधारकार्ड मोहिमेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी सचिंंद्र प्रताप सिंह यांनी एका पत्राद्वारे कौतुक केले आहे.
नत्थू महाराजांनी संपूर्ण परिसरात सामाजिक व धार्मिक कार्यासाठी योगदान दिले आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी ते कीर्तनातून जनजागृती करतात. पोलीस पाटील म्हणूनही त्यांचे प्रशासनाला सहकार्य लाभत आहे. त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे देऊरवाडा येथे ९५ टक्के आधारकार्ड नोंदणीचा टप्पा शासनाला गाठता आला. त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी त्यांचे पत्राद्वारे आभार मानले. तहसीलदार किशोर बागडे यांनी सदर पत्र त्यांना प्रदान केले.
यावेळी सरपंच नितीन इंगोले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिम्मत लडके, मंगेश येवले, विलास सुकोडे, शेख आसिफ, प्रफुल्ल चौधरी, शेख एजाज, बबन कांबळेसह गावकरी उपस्थित होते.