अधिकाºयांचा सामाजिक कार्यात सहभाग आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:00 PM2017-10-09T22:00:22+5:302017-10-09T22:00:34+5:30
शासनाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी आपल्या दैनंदिन कामासोबतच सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : शासनाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी आपल्या दैनंदिन कामासोबतच सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, शेतकरी, शेतमजूरांच्या अडचणी समजून घ्याव्या आणि त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन तहसीलदार दिलीप झाडे यांनी केले.
तालुक्यातील वीरखेड येथे राजू पांडे यांच्या शेतात महसूल विभाग, कृषी व पंचायत समितीच्या वतीने शेतकºयांसाठी किटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार झाडे बोलत होते. यावर्षी आतापर्यंत बाभूळगाव तालुक्यात फवारणी करताना एकाही शेतकºयाला विषबाधा होऊन आपला प्राण गमवावा लागला नाही, असे असले तरी काहींना मात्र ईजा झाल्याचे सांगण्यात आले. शेतकरी-शेतमजूर यांनी फवारणी करताना पायात फूट, मास्क, अंगरखा, जॅकेट, चष्मा, टोपी, हातमोजे आदी साहित्य घालूनच फवारणी करावी, असे दिलीप झाडे यांनी सांगितले.
यावेळी सतीश मानलवार, नायब तहसीलदार एम. बी. मेश्राम व डी. पी. बदकी, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण लखमोडे, गजानन पांडे, व्ही. एम. कोडापे, मंडळ अधिकारी प्रफुल घोडे, जयवंत ईसाळकर, भाऊ गावंडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
तहसीलदार झाडे यांनी स्वत: पंप पाठीवर बांधून व सुरक्षा किट घालून फवारणी कशी करावी, याबाबत प्रात्यक्षिक दाखविले. या कार्यक्रमाला राजू पांडे, प्रकाश राठी, राजू नवाडे, सुधीर जगताप, महेश दांडेकर, निलेश श्रीश्रीमल, मोहित राठी, मारोती ढोले, आसिफ हाजी अबुबकर, अबीब बेग, शैलेश ऊके, विनय ठाकरे, अतुल आसरकर, राजू बेले, अतुल घागरे तथा परिसरातील शेतकरी-शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.