जुने महसुली रेकॉर्ड जीर्ण

By Admin | Published: July 25, 2014 12:04 AM2014-07-25T00:04:29+5:302014-07-25T00:04:29+5:30

सुमारे १००-१५० वर्षांपूर्वीचे जुने महसुली रेकॉर्ड आता पूर्णपणे जीर्ण झाले आहे. या रेकॉर्डचे संगणकीकरण करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा हे रेकॉर्ड नेस्तनाबूत होण्याचा धोका वाढला आहे.

Old Revenue Record Critical | जुने महसुली रेकॉर्ड जीर्ण

जुने महसुली रेकॉर्ड जीर्ण

googlenewsNext

नांदेपेरा : सुमारे १००-१५० वर्षांपूर्वीचे जुने महसुली रेकॉर्ड आता पूर्णपणे जीर्ण झाले आहे. या रेकॉर्डचे संगणकीकरण करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा हे रेकॉर्ड नेस्तनाबूत होण्याचा धोका वाढला आहे.
महसूल सोबतच कोणत्याही कार्यालयात जुने रेकॉर्ड जपून ठेवले जाते. मात्रा हे रेकॉर्ड अत्यंत जीर्ण झाले आहे. कागदपत्रांच्या गठ्ठ्यांमधून व्यवस्थित कागद काढणे कठीण झाले आहे. अनेकांना जुन्या रेकॉर्डची गरज भासते. विविध दाखल, प्रमाणपत्रे काढण्यासाठी जुने रेकॉर्ड उपयोगी पडते. एखाद्या नागरिकाने रेकॉर्ड मागणीकरिता अर्ज सादर केल्यानंतर त्याला ते कागदपत्र देताना पाने फाटलेली आढळतात.
अनेक शासकीय कार्यालयांमध्ये रेकॉर्ड ठेवलेल्या खोलीमध्ये पावसाळ्यात पाणी गळते. त्यामुळे जुने रेकॉर्ड आता अत्यंत खराब झाले आहे़ त्यामुळे संबंधित रेकॉर्ड लिपीकाकडून रेकॉर्ड जीर्ण असल्यामुळे नक्कल पुरविता येत नाही, अशी उत्तरे मिळतात़ अनेकदा ग्रामस्थांना १0 वर्षांपूर्वी ज्या रेकॉर्डची प्रत काढली, त्याची पुन्हा प्रत काढण्यासाठी मागणी केली असता ते रेकॉर्डच जागेवर आढळून येत नाही. परिणामी नेमके ते रेकॉर्ड कुठे गेले, त्या पानांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
रेकॉर्ड गहाळ होण्यास संबंधित लिपीकही जबाबदार नसतो़ अनेक वर्षात अनेक लिपीकांच्या हातून ते रेकॉर्ड गेलेले असते. पाने चाळताना ते कागदपत्र आणखी जीर्ण होतात. त्यामुळे कागदपत्रांचा चुरा होतो. मात्र रेकॉर्ड मिळत नसल्याने जनतेचे हाल होतात. जन्मनोंद, कोतवाल बुकाची नक्कल, हक्क नोंदणी हा जुना पुरावा जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्राकरिता मागण्यात येतो. त्याच पुराव्याच्या आधारे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते. वर्षानुवर्षे ही कागदपत्रे तहसीलमध्ये बांधून पडलेली असतात. जागीच ती जीर्ण होतात. अनेकदा तर त्यांचा भुगा पडतो. त्यामुळे नागरिकांना त्याची नक्कल मिळणे अनेकदा कठीण जात असते. (वार्ताहर)

Web Title: Old Revenue Record Critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.