दीड लाखांचे बनावट बीटी बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:37 PM2018-06-06T22:37:42+5:302018-06-06T22:37:42+5:30

सुमारे दीड लाख रूपये किंमतीचे बनावट बी.टी.बियाणांची साठवण करणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी कृषी विभागाच्या पथकाने पहापळ येथे संबंधित घरी धाड टाकून ही कारवाई केली.

One and a half million fake BT seeds seized | दीड लाखांचे बनावट बीटी बियाणे जप्त

दीड लाखांचे बनावट बीटी बियाणे जप्त

Next
ठळक मुद्देपहापळ येथे कारवाई : पांढरकवडा कृषी विभागाच्या पथकाची धाड

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : सुमारे दीड लाख रूपये किंमतीचे बनावट बी.टी.बियाणांची साठवण करणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी कृषी विभागाच्या पथकाने पहापळ येथे संबंधित घरी धाड टाकून ही कारवाई केली.
स्वामलू व्यंकटेश्वरलू कोट्टा (१९) रा.गोवाडा (आंध्र्रप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. पहापळ येथे त्याचे घर असून त्याने शेतकºयांना विकण्यासाठी त्याच्या घरात एक लाख ५३ हजार रूपये किंमतीच्या ९४ किलो बी.टी. बियाणांचा साठा करून ठेवला होता. याबाबत गोपनीय माहिती मिळताच पांढरकवडाचे कृषी अधिकारी सोनाली कवडे यांच्या नेतृत्वात मंगळवारी सायंकाळी पहापळ येथील स्वामलू कुट्टा याच्या घरी धाड टाकण्यात आली. या कारवाईत सदर बियाणे जप्त करण्यात आले. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: One and a half million fake BT seeds seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :crimeगुन्हे