सहा हजारांच्या बनावट नाेटासह एकाला अटक; मुकूटबन पाेलिसांची कारवाई 

By सुरेंद्र राऊत | Published: March 5, 2024 05:23 PM2024-03-05T17:23:04+5:302024-03-05T17:25:49+5:30

घाेन्सा येथील बाजारात सुरू हाेता वापर.

one arrested with fake note of 6 thousand mukutban police action in yavatmal | सहा हजारांच्या बनावट नाेटासह एकाला अटक; मुकूटबन पाेलिसांची कारवाई 

सहा हजारांच्या बनावट नाेटासह एकाला अटक; मुकूटबन पाेलिसांची कारवाई 

सुरेंद्र राऊत,यवतमाळ : घाेन्सा ता. वणी येथील आठवडी बाजारात एक व्यक्ती बनावट नाेटा चलनात वापरत असल्याची माहिती मुकूटबन पाेलिसांना मिळाली. यावरून सापळा रचून पाेलिसांनी आराेपीला बनावट नाेटासह रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई साेमवारी दुपारी केली. त्याच्याकडून पाच हजार ७०० रूपये किंमतीच्या बनावट नाेटा ताब्यात घेतल्या. 

प्रमाेद किशन गाडगे रा. वल्हासा ता. झरी असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याच्या जवळून १०० रूपयांच्या २४ बनावट नाेटा, दाेनशे रूपयांच्या ९ नाेटा, ५०० रूपयांच्या तीन बनावट नाेटा जप्त केल्या. या प्रकरणी मुकूटबन पाेलिसांनी आराेपी विराेधात कलम ४८९ (ब), ४८९ (क), २४३ भादंवी नूसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ठाणेदार संताेष मनवर, उपनिरीक्षक प्रविण हीरे, खुशाल सुरपाम, दिपक ताठे, दिलीप जाधव, शेख नईम, संदिप बाेरकर, अंकूश बाेरकर यांनी केली. 

ग्रामीण भागातील बजारामध्ये नाेटांची फारसी पडताळणी केली जात नाही. याचा फायदा घेवून बनावट चलनी नाेटा वापरात आणल्या जात असल्याचे या कारवाई पुढे आले आहे. आता पर्यंत केवळ शहीर भागतच त्याही प्रामुख्याने पेट्राेल पंपावर बनावट नाेटांचा वापर केला जात असल्याचे मानले जात हाेते. अनेक कारवाईत हे उघडही झाले. प्रथमच गावतील बाजारात बनावट नाेटा पाेहाेचत असल्याचे दिसत आहे. यावरून बनावट नाेट तस्काराचे नेटवर्क किती खाेलवर पाेहाेचले आहे, हे सिध्द झाले आहे.

Web Title: one arrested with fake note of 6 thousand mukutban police action in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.