दिवंगतांच्या वारसांना दीड कोटींची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:45 PM2018-07-29T23:45:35+5:302018-07-29T23:46:13+5:30
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेला मागील आर्थिक वर्षात आठ कोटी रुपये निव्वळ नफा झाला. संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश दिला जाईल, अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनी मुकुटबन येथे झालेल्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेला मागील आर्थिक वर्षात आठ कोटी रुपये निव्वळ नफा झाला. संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश दिला जाईल, अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनी मुकुटबन येथे झालेल्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
सचिव राजेंद्र पिंपळशेंडे यांनी अहवाल वाचन केले. विषय पत्रिकेवरील १८ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. दारव्हा, दिग्रस व नेर येथील सभासदांच्या हितासाठी दारव्हा येथे शाखा उघडण्याचा निर्णय सभेत घतला. ८६८० सभासद असणाऱ्या या संस्थेत २८० कोटी रुपयांच्या ठेवी असून २३३ कोटींचे कर्जवाटप केले आहे. निव्वळ नफा आठ कोटी रुपये आहे. यापैकी पाच कोटी ९५ लाख रुपये १५ टक्के प्रमाणे लाभांश सभासदाना देण्यात येणार आहे. या आर्थिक वर्षात ३७ दिवंगत सभासदांच्या वारसांना एक कोटी ६० लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती राजुदास जाधव यांनी सभेत दिली.
सभेमध्ये सभासदांच्या विविध विषयांवर २० प्रश्नांची उत्तरे अध्यक्षांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष पवन आत्राम, संचालक नंदेश चव्हाण, प्रवीण राणे, चित्तरंजन कडू, संजय गावंडे, दीपक दोडके, डॉ.दिलीप चौधरी, शेख लुकमान, एकनाथ गाडगे, सुचिता बोंद्रे, गौतम कांबळे, अनिल जयसिंगपुरे, मधुकर काठोळे, नंदा चाटे, मुकेश भोयर, विजय मिरासे, भानुदास राऊत आदी उपस्थित होते.