इंझाळाच्या रॉयल्टीवर एकलासपुरात रेती उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:49 PM2018-02-27T23:49:05+5:302018-02-27T23:49:55+5:30

एका घाटाच्या रॉयल्टीवर दुसऱ्या घाटातील रेतीचा उपसा करण्याचा प्रकार वर्धेत नवा नाही. असाच प्रकार पुलगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाला आहे.

One day, on the royalties of Anjal, | इंझाळाच्या रॉयल्टीवर एकलासपुरात रेती उपसा

इंझाळाच्या रॉयल्टीवर एकलासपुरात रेती उपसा

Next
ठळक मुद्देपाच जणांना अटक : ३२.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑनलाईन लोकमत
पुलगाव : एका घाटाच्या रॉयल्टीवर दुसऱ्या घाटातील रेतीचा उपसा करण्याचा प्रकार वर्धेत नवा नाही. असाच प्रकार पुलगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाला आहे. येथे इंझाळा येथील रेती घाटाच्या रॉयल्टीरवर एकलासपूर येथील रेती घाटावरून रेतीचा उपचार करणाºया पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ३२ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
रेती माफीयाला आवळण्याकरिता पोलीस विभागाला विशेष अधिकार दिले असतानाही केवळ महसूल विभागाकडून सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारामुळे त्याला आळा घालणे अवघड जात आहे. हाच प्रकार सुरू असल्याच्या माहितीवरुन पुलगाव पोलिसांनी कारवाई करीत तब्बल पाच जणांना अटक केली आहे. मौजा एकलासपूर येथील ईदगाह जवळील वर्धा नदीच्या पात्रातून काही जण रेतीची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल दुधकोहळे, जमादार विवेक बनसोड, राजू कुरसंगे, प्रदीप सहाकाटे, रूपेश रघाटाटे, सैनिक कापसे आणि वाहन चालक प्रशांत मौजे यांची या घटावर छापा टाकला.
येथे संतोष थीकमचंद पनपालिया रा. नाचणगाव याने इंझाळा येथील वाळू साठाधारक शकील खान रा. पुलगाव याच्या मदतीने संगनमत करून इंझाळा येथील वाळू साठ्याच्या रॉयल्टीवर मौजा एकलासपूर येथील वर्धा नदीचे पात्रातील वाळुची चोरी केली. या रेतीचा ईदगाहजवळ अवैध साठा करून वाळुची चोरटी वाहतूक करताना पाच जणांना अटक करण्यात आली. यात जप्त केलेली रॉयल्टीही खोटी असल्याचे दिसून आले.
यावरून पोलिसांनी संतोष भिकमचंद पनपालिया (४०) रा.नाचणगाव, टिप्पर चालक रमेश देविदास चौधरी (५०) रा. किरण नगर, अमरावती, मंगेश मनोहर फेंडर (२७) रा. तळेगाव (दशासर), शेख ईमरान शेख मन्नान (२७), रा. मांजरखेड, अमरावती, शंकर रमेश अनोले (३३) रा. वडाळी या पाच जणांना अटक केली. या कारवाईत जेसीबी क्रमांक एमएच ३२ पी ५६४७ किंमत २० लाख रुपये, टिप्पर क्र. एमएच १२ सिटी ९५०८ किंमत ३ लाख, टिप्पर क्रमांक एमएच ०४ डीडी ८२८६ किंमत ३ लाख रुपये, टिप्पर क्र. एमएच ०२ वायए ९११८ किंमत ३ लाख, टिप्पर क्रमांक एमएच २७ बिएक्स ०६४५ किंमत ३ लाख व १६ ब्रास वाळू किंमत १६ हजार असा एकूण ३२ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरूद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ३७९, ३४, १८८ भादंवि सहकलम १३०/१७७, ३(१)१८१ मोवाका गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांनी केली.

Web Title: One day, on the royalties of Anjal,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.