वाहनात सापडले एक लाख

By admin | Published: November 24, 2015 05:37 AM2015-11-24T05:37:54+5:302015-11-24T05:37:54+5:30

वणी ते चिखलगाव मार्गावर एका विना क्रमांकाच्या कारमधून पोलिसांनी रोख एक लाख १५ हजार रूपये जप्त केले. ही घटना

One lakh found in the vehicle | वाहनात सापडले एक लाख

वाहनात सापडले एक लाख

Next

वणी : वणी ते चिखलगाव मार्गावर एका विना क्रमांकाच्या कारमधून पोलिसांनी रोख एक लाख १५ हजार रूपये जप्त केले. ही घटना शनिवारी घडली. दोन दिवसानंतर सोमवारी या घटनेची माहिती देण्यात आली.
शहरातून यवतमाळकडे जाणाऱ्या मार्गावर चिखलगाव आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने धावतात. शनिवारी लालपुलिया परिसरात भर दुपारी २.३० वाजताच्या सुमारास यवतमाळकडून चंद्रपूरच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाची आणि विना क्रमांकाची इनोव्हा गाडी धावत होती. ही गाडी अगदी सुसाट वेगाने जात होती. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक दीपक पवार व डीबी पथकाचे सुधीर पांडे गस्तीवर होते. त्यांना या वाहनाचा संशय आला. त्यामुळे त्यांनी गाडीला अडविण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना बघून वाहन चालकाने पुन्हा भरधाव वेगाने गाडी हाकली. हे वाहन सुसाट वेनागे वणीकडे निघाले. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून चिखलगाव परिसरातील एका ट्रान्सपोर्ट कार्यालयासमोर वाहनाला कसेबसे अडविले. या वाहनाची तपासणी केली असता चालकाजवळ वाहनाचे कोणतेही कागदपत्र आढळले नाही. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता डिकीमध्ये १०० रूपयांचे १२ नोटांचे बंडल आढळले. त्यात एक लाख १५ हजार रूप्ये होते. पोलिसांनी याबाबत चालक चंद्रकांत मुकींदा टेकाम (३०), राजेंद्रनगर, वॉर्ड क्र. एक, बल्लारपूर (जि.चंद्रपूर) याला विचारण केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाही. अखेर पोलिसांनी पाच लाख किंमतीच्या ईनोव्हाला (क्रमांक एम.एच. ३१-सी.एन.८९३९) ताब्यात घेऊन वाहन चालकाविरूद्ध कलम ४१ (१) (४) गुन्हा दाखल केला. वाहनातील पैसे जप्त करण्यात आले.
लालपुलिया परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा व्यापार चालतो. या परिसरात अनेक कोळसा डेपो तआहेत. त्यात काही अवैध डेपोंचाही समावेश आहे. त्यामुळे हे पैसे कोळसा व्यापाऱ्यांच्या देवाण-घेवाणीसाठी आले असावे की काय ?, अशी शंकता उप्स्थित होत आहे. सोबत अनुचित प्रकारातून अवैध पद्धतीने पैसा बाहेर गावी जात असावा, अशीही चर्चा आहे. ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक पुढील तपास करीत आहे. दरम्यान शनिवारीच टिळनगरमध्ये धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी दोन लाख ४२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घरफोडीत आरोपी अद्याप गवसले नाही. त्यानतंर त्याच दिवशी नेमका त्याच वेळी लालपुलिया परिसरात हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: One lakh found in the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.