जिल्ह्यात एक लाख दहा हजार नागरिक आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 05:00 AM2020-10-28T05:00:00+5:302020-10-28T05:00:24+5:30

अभियानांतर्गत होत असलेल्या सर्वेक्षणात मधुमेह, उच्च रक्तदाब या आजाराचीच नोंद घेतली जात आहे. काविळ, न्युमोनिया, डेंग्यू यासारख्या गंभीर आजाराची नोंद घेण्यासाठी सर्वेक्षकांजवळ आवश्यक ती साधने नाहीत. कुटुंबातील व्यक्तीने सांगितलेल्या आजाराची नोंद तेवढी या सर्वेक्षकांकडून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

One lakh ten thousand citizens fell ill in the district | जिल्ह्यात एक लाख दहा हजार नागरिक आजारी

जिल्ह्यात एक लाख दहा हजार नागरिक आजारी

Next
ठळक मुद्दे माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान : सात हजार ५७७ नागरिकांनी केल्या कोरोना चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना हा विषाणूजन्य आजार आहे. या आजारात रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या नागरिकांवर त्याचा परिणाम जाणवतो. यामुळे अशा नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण हे अभियान राबविण्यात आले. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील एक लाख दहा हजार ३७४ नागरिक विविध आजारांचे रुग्ण असल्याची बाब पुढे आली आहे. यामध्ये सात हजार ५७७ नागरिकांनी आपली कोरोना टेस्ट करून घेतली आहे. आजारी असणाऱ्या नागरिकांमध्ये बीपी, शुगर, न्यूमोनिया, डेंग्यू, मलेरिया, काविळ यासारख्या आजारांचा यामध्ये समावेश आहे. ही संपूर्ण माहिती एका विशिष्ट सॉफ्टवेअरमध्ये अपडेट केली जात आहे.

सर्वेक्षणात मधुमेह, उच्च रक्तदाबाची नोंद
अभियानांतर्गत होत असलेल्या सर्वेक्षणात मधुमेह, उच्च रक्तदाब या आजाराचीच नोंद घेतली जात आहे. काविळ, न्युमोनिया, डेंग्यू यासारख्या गंभीर आजाराची नोंद घेण्यासाठी सर्वेक्षकांजवळ आवश्यक ती साधने नाहीत. कुटुंबातील व्यक्तीने सांगितलेल्या आजाराची नोंद तेवढी या सर्वेक्षकांकडून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील अभियानाचे दोनही टप्पे पार पडले आहे. यवतमाळ जिल्हा अभियान राबविण्यात टॉप-१० मध्ये आहे. ही माहिती गोळा झाल्यामुळे विविध उपाययोजना राबविताना त्याचा फायदा होणार आहे.
- एम.डी. सिंह, जिल्हाधिकारी

९९८१ कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आरोग्य विभागाने राबविलेल्या मोहिमेच्या माध्यमातून ८९ हजार १२१ नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील नऊ हजार ९८१ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह होते. यातील आठ हजार ८७६ जण बरे झाले आहेत.

कुटुंबाचे आरोग्य कार्ड
आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले. यामध्ये प्रत्येक कुटुंबाची आणि त्या कुटुंबातील आजाराची माहिती घेण्यात आली. कुटुंबाचे आरोग्य कार्ड शासनाच्या दप्तरी जमा झाले आहे.

आरोग्याची माहिती घेतली
सर्वेक्षण झालेल्या एका कुटुंबातील सदस्यांनी आपला अनुभव सांगितला. सर्वेक्षकांनी कुटुंबातील सदस्यांची माहिती मागितली. कुणाला कुठला आजार आहे काय, याची नोंद घेतली असल्याचे हे कुटुंब म्हणाले.

Web Title: One lakh ten thousand citizens fell ill in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.