पूस धरणात एक टक्काच साठा

By admin | Published: May 29, 2016 02:33 AM2016-05-29T02:33:01+5:302016-05-29T02:33:01+5:30

पूस धरणाची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीपुरवठा करताना नगरपालिकेची दमछाक होत आहे.

One percent of the reserves in Pus dam | पूस धरणात एक टक्काच साठा

पूस धरणात एक टक्काच साठा

Next

पाण्याचा अपव्यय टाळा : १ जूनपासून पुसदकरांना चार दिवसाआड होणार पाणीपुरवठा
पुसद : पूस धरणाची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीपुरवठा करताना नगरपालिकेची दमछाक होत आहे. धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवनामुळे पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे १ जूनपासून पुसद शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरणातून सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सहजपणे होऊ शकतो. एवढा जलसाठा पूस धरणात आहे. असे नगर पालिकेकडून संकेत देण्यात येत होते. मात्र एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. तसेच धरणातून होणाऱ्या पाणी चोरीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. आज पूस धरणाचा जलसाठा केवळ एक टक्का आहे. पाणी पातळीतील ही प्रचंड घट चिंतेची बाब आहे. १ जूनपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी सांगितले.
महिनाभरापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. आता जलसाठा नाममात्र उरल्यामुळे पाणीपुरवठ्याचा कालावधी
पाच दिवसापर्यंत वाढविण्यात येणार आहे.
१ जूनपासून पुसद शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून २० जूनपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. त्यापूर्वी पावसाने हजेरी लावली तर पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊ शकेल. पूस धरणात एक टक्काच जलसाठा आहे. तेव्हा नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी कले आहे.
नदीपात्रही कोरडेठाक
मे महिना संपत असला तरी पुसदवासी प्रचंड उकाड्याने हैरान झाले आहे. दिवसेंदिवस उन्हाळ््याची तीव्रता वाढतच आहे. पूर्वी पूस नदीला भरपूर पाणी असल्याने मुले उन्हाळी सुटीमध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत होती. मात्र यावर्षी पूस नदीचे पात्रही प्रचंड तापमानामुळे कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे मुले पोहण्याऐवजी केवळ व्हिडीओ गेम आणि मोबाईल गेममध्येच गुरफटून गेले आहेत. पूस नदी कोरडी पडल्याने उत्साही मुलांचा पुरता हिरमोड झालेला आहे. त्यातत विजेचा लपंडाव आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा दुहेरी संकटाने चिमुकल्यांसाठी उन्हाळी सुटी एक प्रकारे त्रासदायकच ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)

सिंचन विभाग जबाबदार
त्यातच अघोषित भारनियमनामुळे शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. १५ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. मार्च महिन्यापर्यंत पूस धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी झाली. हजारो मोटारपंपाच्या माध्यमातून धरणातून पाण्याचा उपसा सुरू होता. जलसाठा स६ा टक्के उरला त्यावेळीही पाणी उपसा करण्यावर सिंचन विभागाने फार उशिरा धडक पावले उचलली. तसेच फेब्रुवारी-मार्च महिन्यात सिंचन विभागाने निर्धारित वेळापत्रकापेक्षा अधिक दिवस कॅनॉलद्वारे पाणी सोडले, त्यामुळे धरणाचा जलसाठा कमी झाला आहे. सध्या पुसदकरांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. याला सिंचन विभागाचे अधिकारी पूर्णत: जबाबदार असल्याचे शहरवासीयांचे
म्हणणे आहे.

Web Title: One percent of the reserves in Pus dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.