वन-पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्च आॅपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:31 PM2018-07-17T22:31:50+5:302018-07-17T22:32:18+5:30
खंडाळा वनपरिक्षेत्रातील जनुना परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर सागवान तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी वन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे सर्च आॅपरेशन मोहीम राबविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : खंडाळा वनपरिक्षेत्रातील जनुना परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर सागवान तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी वन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे सर्च आॅपरेशन मोहीम राबविली.
जनुना परिसरातील जंगलात सागवान तस्कर लाकूडतोड करीत होते. या तस्करांना वनपाल जयंत राठोड यांनी लाकडे तोडण्यास मनाई केली. खंडाळा बीटमध्ये ही घटना घडली. राठोड यांच्या मनाईने संतापलेल्या सागवान तस्करांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वनपाल जखमी झाले. त्यानंतर त्यांनी पुसद ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जवळपास १३ जणांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी वन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे सर्च आॅपरेशन मोहीम राबविली. यातून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. मंगळवारी तालुक्यातील खंडाळा व वसंतनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी व पुसद वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे खंडाळा, अमृतनगर, मारवाडी वन क्षेत्रात सर्च आॅपरेशन केले. या सर्च आॅपरेशनमध्ये पुसद, काळी दौ, महागाव, शेंबाळपिंपरी व दिग्रस वनपरिक्षेत्रातील सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यांनी प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. या सर्च आॅपरेशनमध्ये उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस अजयकुमार बन्सल, एसीएफ बी.एन. पायघन, बापू कऱ्हे, रत्नपारखी, आरएफओ आनंद धोत्रे, हेमंत उबाळे, एस.एस. जोग, सचिन सावंत, संदीप गिरी, विठ्ठल मळघने, सुभाष पवार, वनपाल शालिक जाधव, संघई, शेरे, सुरेश राठोड, पी.के.जाधव, जयंत राठोड, आर.आर. राठोड, गंगाखेडे, खान, मस्के, अर्जून राठोड आणि वसंतनगरचे ठाणेदार चौबे, खंडाळाचे ठाणेदार ठाकूर यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.