यवतमाळातील पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या एकाला सुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:24 PM2020-05-21T20:24:45+5:302020-05-21T20:25:04+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या एका जणाला सुट्टी देण्यात आली आहे. या व्यक्तिचा सुरवातीचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला होता. मात्र उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या एका जणाला सुट्टी देण्यात आली आहे. या व्यक्तिचा सुरवातीचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला होता. मात्र उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी झाली आहे. त्यामुळे आता अॅक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १५ वर आली असून सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २४ जण भरती आहेत. यापैकी ९ प्रिझमटिव्ह केसेस आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता आज १५ नमुने पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण १८६२ नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यापैकी १८४७ प्राप्त तर १५ अप्राप्त आहेत. आतापर्यंत १७३७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात १५ तर गृह विलगीकरणात ५८१ जण आहेत.