‘एसपी’ कार्यालयातच आॅनलाईनची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 09:54 PM2017-10-30T21:54:35+5:302017-10-30T21:54:47+5:30
सर्वसामान्य नागरिकांना व्यक्तिगत अथवा पोलीस विभागाशी संबंधित तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी स्वरूपात द्याव्या लागत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सर्वसामान्य नागरिकांना व्यक्तिगत अथवा पोलीस विभागाशी संबंधित तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी स्वरूपात द्याव्या लागत होत्या. आता यातून नागरिकांची सुटका झाली आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयातील आवक-जावक विभागातच आॅनलाईन नोंदविता येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. तिथे संगणक उपलब्ध करून देत कर्मचारी नियुक्त आहे. ई-तक्रार केंद्राचे लोकार्पण पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या हस्ते झाले.
नागरिकांसाठी ६६६.ेँस्रङ्म’्रूी.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे तक्रारींचे अतिशय कमी वेळेत निराकरण करता येणे शक्य होणार आहे. पूर्वी नागरिकांना स्वत: तक्रार लिहून आणावी लागत होती. त्यानंतर ही आवक-जावक विभागात दिली जात असे. येथून ही तक्रार विविध टेबलचा प्रवास करत नंतर संबंधित विभागाकडे जात होती. आता आॅनलाईन तक्रारीमुळे थेट त्याच विभागाकडे ही तक्रार पाठविण्यात येणार आहे. शिवाय जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस ठाणे सीसीटीएन्स प्रणालीमुळे अपडेट आहेत. याचा फायदा नागरिकांना मिळणार आहे. सिसिटीएन्स प्रणाली पूर्ण क्षमतेने वापरणार राज्यातील यवतमाळ पहिला जिल्हा आहे. ई-केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, विप्रोचे प्रतिनिधी नीलेश ठाकरे, जमादार इंगोले आदी उपस्थित होते.