आॅनलाईन फसवणुकीतील पैसाही मिळतो परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:30 PM2018-08-29T23:30:54+5:302018-08-29T23:31:45+5:30

चोरी-घरफोडीच्या घटनेत आरोपी सापडला व त्याच्या कबुलीवरून सोन्या-चांदीच्या ऐवजाची जप्ती झाल्यास हा मुद्देमाल न्यायालयातून परत मिळतो. परंतु आता आॅनलाईन फसवणूक झाली असेल तर त्यातील रक्कमही परत मिळविणे शक्य आहे.

Online fraud gets money back | आॅनलाईन फसवणुकीतील पैसाही मिळतो परत

आॅनलाईन फसवणुकीतील पैसाही मिळतो परत

Next
ठळक मुद्देयवतमाळ सायबर सेलचे यश : दहा गुन्ह्यांमधील रकमेचा परतावा, मात्र २४ तासात तक्रार नोंदविणे आवश्यक

सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चोरी-घरफोडीच्या घटनेत आरोपी सापडला व त्याच्या कबुलीवरून सोन्या-चांदीच्या ऐवजाची जप्ती झाल्यास हा मुद्देमाल न्यायालयातून परत मिळतो. परंतु आता आॅनलाईन फसवणूक झाली असेल तर त्यातील रक्कमही परत मिळविणे शक्य आहे. यवतमाळच्या सायबर सेलने अशा एक नव्हे तर तब्बल दहा प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तींना रोख रकमेचा परतावा दिला आहे.
आॅनलाईन शॉपिंग अ‍ॅप आणि इतरही वेबसाईटवरून आॅनलाईन खरेदी केली जाते. अनेकदा या व्यवहारात ग्राहकांची फसवणूक केली जाते. फोन कॉल करून कस्टमर केअरमधून बोलतो अशी बतावणी करून डिलेव्हरीबाबत विचारणा करीत ग्राहकांकडून त्याचा एटीएमचा क्रमांक व ओटीपी विचारण्यात येतो. त्यानंतर संबंधित व्यक्ती थेट बँक खात्यातूून घसघशीत रक्कम काढून घेतो. या पध्दतीने अनेकांची फसवणूक झाली आहे. प्रतिभा कृष्णराव पवार रा. व्यकंटेशनगर यांनी २२५ रुपयांचे घड्याळ खरेदी केले होते. मात्र त्यांच्या बँक खात्यातून ३५ हजाराची रोकड पळविली, स्वाती रमेश भूत यांची आॅनलाईन सोने खरेदीत ५० हजाराने फसवणूक झाली. याचप्रमाणे इतरही दहा जणांना गंडा घातला गेला. या सर्वांनी घटना घडल्यानंतर २४ तासाच्या आत पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. नंतर ठाण्यातून तक्रारीची पोच घेतलेला अर्ज थेट सायबर सेलमध्ये सादर केला. सायबर सेलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ग्राहकांच्या बँक खात्यातून व्हर्च्यूल व्हॅलेटमध्ये वळती झालेली रक्कम तत्काळ थांबविण्याची सूचना दिली. त्यामुळे आॅनलाईन व्यवहारातील रक्कम परत मिळविता आली. सायबर सेलकडे तक्रार अर्जाची पोच देताना बँकेतून पैसे वळते झाल्याचा एसएमएसचे स्क्रिन शॉट, एटीमएचे डिटीएल्स, बँक पासबुक आणि आधार कार्ड इतके कागदपत्र फसवणूक झालेल्या व्यक्तीने तत्काळ सादर केल्यास त्याला निश्चितच फायदा होऊ शकतो.
अशी होते पैसे थांबविण्याची प्रक्रिया
देशपातळीवरच्या बँका, आॅनलाईन खरेदी विक्री करणाºया कंपन्याचे नोडल अधिकारी, सायबर सेलमधील पोलीस अधिकारी - कर्मचारी यांचा ‘स्टॉप बॅकींग फ्रॉड’ या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रृप आहे. फसवणुकीची तक्रार येताच सायबर सेलेकडून व्हर्च्युल पॉकेटमध्ये जमा झालेल्या रकमेचे ट्राझिक्शन थांबविण्याचे निर्देश दिले जाते. त्यानंतर हा पैसा पुढे जात नाही. संबंधित कंपनीच्या खात्यात रक्कम जमा होत नाही. हा पैसा परत बोलविण्याची प्रक्रिया करून फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नुकसान थांबविता येते. ही कामगिरी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलचे प्रमुख पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वात फौजदार श्रीकांत जिंदमवार, सुमित पाळेकर, दिगांबर पिलावन, पंकज गिरी, अजय निंबोळकर, प्रगती कांबळे, रोशनी जोगळेकर यांनी केली आहे.

ग्राहकांची सतर्कता आणि सायबर सेलचे तांत्रिक कौशल्य यातून आॅनलाईन फसवणुकीचे गुन्हे सहज उघड करता येते.
- श्रीकांत जिंदमवार,
फौजदार, सायबर सेल.

Web Title: Online fraud gets money back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.