पुसदमध्ये ऑनलाईन निशुल्क बाल योग संस्कार शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:40 AM2021-05-16T04:40:34+5:302021-05-16T04:40:34+5:30
पुसद : पतंजली योग समिती व महिला पतंजली योग समितीच्यावतीने येथे आठ दिवसीय ऑनलाईन निशुल्क बाल योग संस्कार शिबिर ...
पुसद : पतंजली योग समिती व महिला पतंजली योग समितीच्यावतीने येथे आठ दिवसीय ऑनलाईन निशुल्क बाल योग संस्कार शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात महाराष्ट्रातून ५ ते १२ वयोगटातील ३३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन भारत स्वाभिमान न्यास जिल्हा प्रभारी दिनेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शोभा भागीया, भारती पालीवाल उपस्थित होत्या. योगासन, प्राणायाम, व्यायाम, सूर्य नमस्कार, बोधपर कथा व क्रिएटिव ॲक्टिव्हिटीजसोबतच व्हाॅट्सॲप मोबाईलव्दारा विविध ज्ञानवर्धक पझल, एक मिनिट खेळ घेण्यात आले. नीता गोरे यांनी उपक्रम घेऊन मुलांना आनंदित केले. योगासन, प्राणायाम याविषयी प्रकाश वानरे, माधुरी वानरे, रंजना कीन्हिकर, प्रतिभा वानरे, नीता गोरे, स्वाती जोल्हे, संजय चाफले, सतीश उपरे, माया चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. संचालन अंशुल आहाळे या विद्यार्थ्याने केले. सहभागी विद्यार्थ्यांची ऑनलाईन टेस्ट घेण्यात आली. त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले.