रबीचे कर्जवाटप केवळ १० टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:34 PM2018-12-26T21:34:04+5:302018-12-26T21:34:16+5:30

खरिपात पीककर्ज वाटप करताना आखडता हात घेणाऱ्या बँकांनी रबीच्या कर्जवाटपातही उत्साह दाखविलेला नाही. त्यामुळे रबीची जवळपास संपूर्ण पेरणी आटोपल्यावरही कर्जवाटपाचे प्रमाण केवळ १० टक्केच आहे.

Only 10 percent of Rabi loan | रबीचे कर्जवाटप केवळ १० टक्केच

रबीचे कर्जवाटप केवळ १० टक्केच

Next
ठळक मुद्देक्षेत्र दोन लाख हेक्टर : बँकांनी दुष्काळाची केली ढाल

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खरिपात पीककर्ज वाटप करताना आखडता हात घेणाऱ्या बँकांनी रबीच्या कर्जवाटपातही उत्साह दाखविलेला नाही. त्यामुळे रबीची जवळपास संपूर्ण पेरणी आटोपल्यावरही कर्जवाटपाचे प्रमाण केवळ १० टक्केच आहे.
रबी हंगामात जिल्ह्यातील बँकांना ६४ कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. मात्र प्रत्यक्षात दोन लाख हेक्टरवर पेरणी झाल्यावरही बँकांनी केवळ सात कोटींचेच कर्ज वाटप केले आहे. या स्थितीत आपल्यावर आरोप होऊ नये म्हणून बँकांनी सावध पवित्रा घेतला आहे. दुष्काळी स्थितीने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटल्याचे कारण बँकांकडून दिले जात आहे.
दरवर्षी दोन लाख हेक्टरवर रबीची पेरणी होते. रबीचे पीक कर्ज वितरित करण्यासाठी निधी राखीव ठेवला जातो. प्रत्यक्षात कर्ज वितरित करताना हात आखडता घेतला गेला. यामुळे खरिपापेक्षाही कमी क्षेत्रावरच पीक कर्जाचे वितरण करण्यात आले.
उद्दिष्ट ६४ कोटीचे वाटप ७ कोटी
यावर्षी ६४ कोटीचे कर्ज वितरणाचे उद्दीष्ट बँकांना देण्यात आले होते. ऊस लागवड क्षेत्रातच सर्वाधिक कर्ज शेतकऱ्यांनी घेतले. आतापर्यंत केवळ सात कोटींचे कर्ज बँकांनी वितरित केले आहे. जिल्हा बँकेने ३८ सभासदांना १९ लाखाचे कर्ज दिले. तर राष्ट्रीयकृत बँकांनी ६९४ सभासदांना सहा कोटी ९६ लाखांचे कर्ज वितरित केले.
खरिपाचे कर्ज न फेडल्याचा परिणाम
खरिपातील पीक कर्जासाठी अधिक निधी दिला जातो. त्या तुलनेत रबीच्या पीक कर्जाची रक्कम कमी आहे. यामुळे शेतकरी रबीचे कर्ज घेत नाही. खरिपातील पीक कर्जाची परतफेड झाली तरच रबीचे कर्ज दिले जाईल, अशी अट बँकांनी घातली आहे. खरिपाच्या कर्ज परतफेडीचा नील दाखला दिल्याशिवाय रबीच्या कर्जाचा प्रस्ताव विचारात घेतला जात नाही. शेतकरी विरोधी भूमिका बँका राबवित आहेत. याच मुळे केवळ दहा टक्के कर्ज वाटप झाले आहे.

Web Title: Only 10 percent of Rabi loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.