इसापूर धरणात केवळ १२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:33 PM2017-09-25T22:33:16+5:302017-09-25T22:33:41+5:30

विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचे असलेले पुसद तालुक्यातील इसापूर येथील धरणात यंदा केवळ १२.७५ टक्के जलसाठा आहे.

Only 12 percent water stock in Isapur dam | इसापूर धरणात केवळ १२ टक्के जलसाठा

इसापूर धरणात केवळ १२ टक्के जलसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देपाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस : रबी हंगामाचे स्वप्न भंगणार

नंदकिशोर बंग ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंबाळपिंपरी : विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचे असलेले पुसद तालुक्यातील इसापूर येथील धरणात यंदा केवळ १२.७५ टक्के जलसाठा आहे. अपुºया पावसाने जलसाठ्यात वाढ झाली नाही. परिणामी रबी व उन्हाळी हंगामात शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळण्याची आशा आत्ताच मावळली आहे.
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प महाराष्टÑातील मोठ्या प्रकल्पापैकी एक आहे. मातीच्या बांधकामातील प्रमुख धरण असून या धरणाला ३२ वर्ष पूर्ण झाली आहे. दरवर्षी शेकडो हेक्टर सिंचन या धरणावरून केले जाते. परंतु यावर्षी राज्यातील सर्व धरण भरली असली तरी इसापूर धरणाची परिस्थिती मात्र बिकट आहे. या धरणाला दोन कालवे असून उजवा कालवा ११७ किलोमीटर मराठवाड्यासाठी आणि ७२ किलोमीटरचा डावा कालवा विदर्भासाठी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, हिंगोली जिल्ह्यातील कळमुनरी, वसमत, नांदेड जिल्ह्यातील हदगाव, भोकर, अर्धापूर, मुतखेड, उमरी या तालुक्याला सिंचनाचा लाभ होतो. धरणाला १५ दरवाजे असून विविध कार्यालये नांदेड, हिंगोली आणि उमरखेड येथे आहे. या धरणाची संचय क्षमता ४४१ मीटर असून धरण निर्मितीनंतर २००२, २००६, २०१०, २०१३ मध्ये धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु यावर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस झाला. परिणामी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. या धरणात सध्या १२.७५ टक्के जलसाठा आहे. एकंदरित इसापूर धरण पाणी नसल्याने उजाड दिसत असून आगामी काळात सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण जाणार आहे.
९५ हजार हेक्टर ओलित क्षेत्र
इसापूर धरणाची ९५ हजार ३५ हेक्टर क्षेत्र ओलित करण्याची क्षमता आहे. यात यवतमाळ जिल्ह्यात १५ हजार ९३७ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात १६ हजार ९०२ हेक्टर, नांदेड जिल्ह्यात ६२ हजार १९६ हेक्टरचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात ओलिताची पिके या भागात घेतली जातात. परंतु यंदा पाणीच नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

धरणात कमीत कमी ३० टक्के जलसाठा असला तरच सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. परंतु या धरणावर आधारित १३ पाणीपुरवठा योजनांना पिण्याचे पाणी पुरेल. सिंचनाची चिंता असली तरी पिण्याचे पाणी मात्र मुबलक मिळेल.
- डी.जी. माने
उपविभागीय अभियंता

Web Title: Only 12 percent water stock in Isapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.