२४ तासांपूर्वीच स्वीकृतांची नावे द्यावी लागणार

By admin | Published: December 26, 2016 01:57 AM2016-12-26T01:57:56+5:302016-12-26T01:57:56+5:30

नगरपरिषद उपाध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षांना अधिकार बहाल करण्याच्या

Only 24 hours will be allowed | २४ तासांपूर्वीच स्वीकृतांची नावे द्यावी लागणार

२४ तासांपूर्वीच स्वीकृतांची नावे द्यावी लागणार

Next

नगरपरिषद : पक्षाच्या संख्याबळानुसार नावे
पुसद : नगरपरिषद उपाध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षांना अधिकार बहाल करण्याच्या निर्णयानंतर आता तौलाणीक संख्याबळानुसार प्रत्येक पक्ष अथवा गटाला आपल्या वाट्याला येणाऱ्या स्विकृत सदस्यांसाठीच्या उमेदवारांची नावे पहिल्याच बैठकीच्या २४ तास अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना कळवावी लागणार आहे. जिल्हाधिकारी त्यांची पात्रता तपासून ही यादी नगराध्यक्ष पाठवतील नंतर निवडीची प्रक्रिया होणार आहे. अशा प्रकारचे परिपत्रक नगरविकास मंत्रालयाने काढले आहे.
जिल्ह्यातील पुसदसह उमरखेड, दिग्रस, घाटंजी, दारव्हा, वणी आणि यवतमाळ या नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबरला मतदान झाले. २८ ला निकाल जाहीर झाला, निवडून आलेल्या सदस्यांची राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर २५ दिवसांच्या आत नगरपालिकांची पहिली सभा घेणे बंधणकारक आहे. पहिल्या बैठकीत उपाध्यक्षांची निवड नवनियुक्त नगरसेवकांमधून हात वर करून होणार आहे. यामुळे गट अथवा पक्षाने व्हिप काढल्यास उपाध्यक्षपदासाठीच्या घोडेबाजारावर मर्यादा येणार आहे. याच बैठकीतून स्विकृत सदस्यांच्या निवडीही होणार आहेत.
यावेळी बैठकीच्या २४ तास अगोदर प्रत्येक पक्षाच्या अथवा गटाच्या गटनेत्याला सभागृहातील त्यांच्या संख्याबळानुसार वाट्याला येणाऱ्या जागांऐवजी किंवा अधिक सदस्यांची नावे विहीत नमुन्यातील अर्ज भरून जिल्हाधिकाऱ्यांना कळवावी लागणार आहेत. त्यामुळे पहिल्या बैठकीच्या अगोदरच स्विकृत सदस्यांबाबतची उत्सुकता संपणार आहे. अर्जाची छाणनी करून पात्र गावांची यादी जिल्हाधिकारी संबंधित नगराध्यक्षांकडे पाठविणार असून, संबंधित पक्षाच्या संख्याबळानुसार ती नावे असतील. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून सबंधित यादीची तपासणी होऊन नंतर ती यादी नगराधक्षांकडे पाठविली जाणार आहे. ही प्रक्रिया थोडी लांबलचक असली तरी पारदर्शकतेमुळे अनेकांनी या पद्धतीला पसंती दर्शविली आहे. परंतु पहिल्या बैठकीतील आवश्यक ती उत्सुकता त्यामुळे कमी होणार असल्याचे दिसते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Only 24 hours will be allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.