तुरीच्या चुकाऱ्याचे केवळ ४० कोटी आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 10:30 PM2018-04-28T22:30:31+5:302018-04-28T22:30:31+5:30
शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीच्या चुकाऱ्याचे ४० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून ही रक्कम शेतकऱ्यांकडे वळती करण्यात आली आहे. तर अद्यापही ४६ कोटी रुपयांच्या चुकाऱ्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीच्या चुकाऱ्याचे ४० कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून ही रक्कम शेतकऱ्यांकडे वळती करण्यात आली आहे. तर अद्यापही ४६ कोटी रुपयांच्या चुकाऱ्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवर ३३ हजार शेतकऱ्यांनी तूर विकण्यासाठी नोंदणी केली. आतापर्यंत एक लाख ६१ हजार क्ंिवटल तुरीची खरेदी करण्यात आली. ही तूर ८६ कोटींच्या घरात आहे. त्यापैकी ४० कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यासाठी रक्कम शेतकऱ्यांकडे वळती झाली आहे. तर ४६ कोटी रुपयांची प्रतीक्षा कायम आहे. दुसरीकडे तूर खरेदीसाठी उघडण्यात आलेले केंद्र जागेअभावी बंद करण्यात आले आहे. हे केंद्र पुन्हा सुरू करण्याच्या सूचना आल्या असल्या तरी जागेअभावी खरेदी रेंगाळत आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. दीड लाख क्ंिवटल तूर खरेदी कशी करावी, असा प्रश्न आहे. उर्वरित १४ दिवसात संपूर्ण तूर खरेदी करणे अवघड झाले आहे.