फक्त ४० टक्के जागा भरणार, नगर परिषदांमध्ये ३१०६ पदे रिक्त : १७८२ पदांच्या परीक्षेवर आक्षेप

By अविनाश साबापुरे | Published: February 2, 2024 08:21 AM2024-02-02T08:21:16+5:302024-02-02T08:21:41+5:30

Jobs: छोट्या शहरांतील सोयीसुविधांचा भार वाहणाऱ्या नगर परिषदांमध्ये तब्बल ५४ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Only 40 percent seats to be filled, 3106 posts vacant in Municipal Councils : Objection to examination of 1782 posts | फक्त ४० टक्के जागा भरणार, नगर परिषदांमध्ये ३१०६ पदे रिक्त : १७८२ पदांच्या परीक्षेवर आक्षेप

फक्त ४० टक्के जागा भरणार, नगर परिषदांमध्ये ३१०६ पदे रिक्त : १७८२ पदांच्या परीक्षेवर आक्षेप

- अविनाश साबापुरे
यवतमाळ - छोट्या शहरांतील सोयीसुविधांचा भार वाहणाऱ्या नगर परिषदांमध्ये तब्बल ५४ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरातील बांधकामे, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, करवसुली, स्वच्छता आदी कामे पाहणाऱ्या विभागात एकंदर पाच हजार ७७४ कर्मचाऱ्यांची गरज असताना गेल्या अनेक वर्षांपासून केवळ दोन हजार ६६८ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर कामांचा भार टाकण्यात आला आहे. ही पदे भरण्यासाठी शासनाने ‘बंपर भरती’ असे नाव देऊन परीक्षा घेतली. मात्र, या परीक्षेतून केवळ ४० टक्के म्हणजे १७८२ पदे भरली जाणार आहेत. तुटपुंज्या भरतीमुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी माहिती अधिकार वापरून रिक्त पदांची माहिती मिळविली. 

बेरोजगारांचा आक्षेप काय? 
-नोकरीची वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या तरुणांनी ऑक्टोबरमध्ये झालेल्या परीक्षेत भाग घेतला. परंतु, या परीक्षेसाठी रिक्त पदांच्या ४०% म्हणजे १७८२ जागा शासनाने गृहीत धरल्या. 
- ३० सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार शंभर टक्के पदभरतीची मुभा देण्यात आली आहे. असे असताना ४० टक्केच पदे का भरली जात आहेत, असा सवाल बेरोजगारांनी उपस्थित केला आहे.   

अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजावर परिणाम, उमेदवारांमध्ये संताप   
आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदांमध्ये १ जानेवारी २०२४ या तारखेपर्यंत केवळ ४६ टक्के पदे भरलेली आहेत. तर, ५४ टक्के म्हणजेच ३१०६ पदे रिक्त आहेत. या दरम्यान शासनाने १७८२ पदांच्या भरतीसाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये परीक्षा घेतली, मात्र त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. निकाल कधी लागेल याची परीक्षार्थींना प्रतीक्षा आहे. 
प्रत्यक्षात ही १७८२ पदे भरल्यानंतरही तब्बल १३२४ पदे रिक्तच राहणार आहेत. नगर परिषदांमधील भरती चार ते पाच वर्षांनंतर होते. त्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे नागरिकांनाही विविध कामांसाठी नगर परिषदांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे वारंवार हेलपाटेच मारावे लागणार आहेत. परिणामी अनेक कामे प्रलंबित राहतात. हा प्रश्न उमेदवारांनी प्रशासनाला कळविला आहे.  

पद    रिक्त      भरती होणार    रिक्तच
स्थापत्य अभियंता    ५८२    ३९१    १९१ 
विद्युत अभियंता    ७९    ४८    ३१ 
संगणक अभियंता    ७७    ४५    ३२ 
पाणीपुरवठा अभियंता    १२६    ६५    ६१ 
लेखापाल, लेखापरीक्षक    ३५१    २४७    १०४ 
कर निर्धारक, एओ    ९९५    ५७९    ४१६ 
अग्निशमन सेवा    ४२३    ३७२    ५१ 
स्वच्छता निरीक्षक    ४७३    ३५    ४३८ 
एकूण    ३१०६    १७८२    १३२४
 

Web Title: Only 40 percent seats to be filled, 3106 posts vacant in Municipal Councils : Objection to examination of 1782 posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.